Vidhwa Pension Yojana 2021 Online Form | Shravan Bal Yojana Maharashtra
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
📢 लाभार्थी पात्रता :- सर्व प्रवर्गातील विधवांना लागू आहे.
योजनेच्या प्रमुख अटी
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा
निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतीमहा व (Vidhwa Pension Yojana 2021)
राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत रु.400/- प्रतीमहा असे एकूण रु.600/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे
किती पेन्शन मिळते ?
प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.
अर्ज कसा करावा ?
ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठी:- येथे अर्ज पहा अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो व तसेच आपले सरकार सेवा पोर्टल वर online अर्ज करू शकता.
Online अर्ज कसा करावा ?
Online अर्ज करण्यासाठी आपण आपल्या जवळील महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) या मध्ये आपण online अर्ज करू शकता किंवा आपण आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल वर आपण online पद्धतीने अर्ज करू शकता तो अर्ज कसा करावा त्यासाठी पुढील:- Video येथे पहा
संजय गांधी निराधार अनुदान योजना
अ क्र | योजना | सविस्तर |
---|---|---|
1 | योजनेचे नाव | संजय गांधी निराधार अनुदान योजना |
2 | योजनेचा प्रकार | राज्य पुरस्कृत योजना |
3 | योजनेचा उददेश | राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन |
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव | सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे. |
5 | योजनेच्या प्रमुख अटी | या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. |
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | या योजनेखाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 600/- प्रतिमहा तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास, रुपये 900/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते. |
7 | अर्ज करण्याची पध्दत | अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो |
8 | योजनेची वर्गवारी | आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन |
9 | संपर्क कार्यालयाचे नाव | जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय /Online अर्ज करण्यासाठी आपण आपल्या जवळील महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) या मध्ये आपण online अर्ज करू शकता किंवा आपण आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल वर आपण online पद्धतीने अर्ज करू शकता तो अर्ज कसा करावा त्यासाठी पुढील Video येथे पहा |
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
अ क्र | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1 | योजनेचे नाव | श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना |
2 | योजनेचा प्रकार | राज्य पुरस्कृत योजना |
3 | योजनेचा उददेश | राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा निवृत्तीवेतन |
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव | सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे. |
5 | योजनेच्या प्रमुख अटी | गट (अ) :-65 व 65 वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्याव्यक्तीना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट (अ) मधून रु.400/- प्रतिमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे रु.200/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रु.400/- प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतिमहाअसे एकूण रु.600/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन मिळते. गट (ब):-या योजनेतंर्गत ज्या व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- च्या आत आहे, अशा वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (गट- ब) मध्ये रुपये 600/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते. |
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते. |
7 | अर्ज करण्याची पध्दत | अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो योजना/तलाठी कार्यालय /Online अर्ज करण्यासाठी आपण आपल्या जवळील महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) या मध्ये आपण online अर्ज करू शकता किंवा आपण आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल वर आपण online पद्धतीने अर्ज करू शकता तो अर्ज कसा करावा त्यासाठी पुढील:- Video येथे पहा |
8 | योजनेची वर्गवारी | निवृत्तीवेतन |
9 | संपर्क कार्यालयाचे नाव | जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय |
📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना ९५% टक्के अनुदानावर सुरु:- येथे पहा