Cotton Rate In Maharashtra :- नमस्कार गेल्यावर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे cottan rate कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाचे जवळपास ३५ ते ४० टक्के नुकसान झाले होते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारासह देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे कापसाला रेकॉर्डब्रेक भाव मिळाला. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, आगामी वर्षात cottan rate देखील कापसाची मागणी कायम राहण्याची शक्यता कॉटन उद्योगातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Cotton Rate In Maharashtra
२०१३ ते २०१८ पर्यंत कॉटन बाजारात मंदी आल्यामुळे देशभसतील अनेक सूत गिरण्या बंद झाल्या होत्या. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कापसाला जी मागणी पाहिजे होती. ती मिळत नसल्याने, त्याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसून आला; मात्र त्यात चीन अमेरिकेचे ट्रेड वॉर, आंतरराष्ट्रीय बाजारात घटलेली मागणी, पाकिस्तानला cotan rate माल देणे थांबविणे अशा विविध कारणांमुळे कापसाची मागणी घटली होती. त्यात उत्पन्न हे सुमारे ३ कोटी ५० लाख गाठींपर्यंत, त्यामुळे कापसाला हमीभाव देखील पुरेसा मिळत नव्हता. २०१९ पासून, शासनाकडून सूत गिरण्यांना अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे बंद पडलेल्या सूत गिरण्या सुरू होऊ लागल्या आहेत.
भाव जास्त राहण्याची काय आहेत कारणे ?
देशभरातील सूत गिरण्यांमध्ये कापसाची मागणी वाढणार आहे. यावर्षी चांगला भाव मिळाल्याने, जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला आहे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरू होईल, तेव्हा जुना माल न राहिल्याने, नव्या मालालाच मागणी राहील. दरवर्षी हंगाम सुरू झाल्यानंतर ३० ते ४० लाख गाठी या जुन्याच असतात; मात्र यंदा यामध्ये मोठी घट होऊन, १ ते ३ लाख गाठीच जुन्या राहण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मागणी कायम राहणार आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या कापसाचे प्रमाण वाढण्याचीही शक्यता आहे.
भारतात एकूण होणारे उत्पादन
३ कोटी ६० लाख गाठी देशातील बाजारात ३ वर्षापूर्वीची लाख मागणी २ कोटी ८० गाठी. आता देशाच्या बाजारात कापसाची मागणी ३ कोटी ४० लाख गाठी. विदेशात होणारी निर्यात ६० ते ७० लाख गाठी. कापसाचे भाव १२ हजार रुपये क्विंटलवर शासनाने निश्चित केलेला हमीभाव ६ हजार क्विटल सध्यस्थितीत खासगी बाजारातील भाव ११,५०० ते १२ हजार. ऑक्टोबर महिन्यात खासगी बाजाराचे दर ७ हजार ७००. नोव्हेंबर महिन्यातील दर ८ हजार ते ८२०० डिसेंबर व जानेवारीचे दर ७ हजार ८०० ते ८२००. फेब्रुवारी ९ हजार मार्च १० हजार एप्रिलमध्ये रेकॉर्डब्रेक भाव १२ हजार.
हेही वाचा : कुकुट पालन साठी शासन देत आहे 75% अनुदान येथे करा अर्ज
कापूस भाव पहा कसे असेल ?
यावर्षी देखील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारासह देशांतर्गत बाजारात देखील कापसाला मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. सूत गिरण्यांमध्ये वाढ झाली आहे. गुजरातमध्ये ५० लाख गाठींची गरज होती. मात्र आता हीच मागणी १ कोटी गाठींपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे यंदा कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.
शेळी पालन व्यवसाय करिता top 5 शेळ्यांच्या जाती येथे क्लिक करून पहा
📢 ई-श्रम कार्ड योजना अंतर्गत शेतकरी व शेत मजुरांना 2 लाख रु. मिळणार :- येथे पहा सविस्तर माहिती
📢 श्रम योगी मानधन योजना अर्ज कसा करावा व अर्ज लिंक :- येथे पहा