Havaman Andaj Maharashtra :- अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात गेल्या 4 दिवसांपासून पाऊस चांगलाच बरसला आहे. यामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
धरणे ओसंडून वाहत आहेत. तसेच ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल आहे. मात्र, तरीही पावसाचा कहर सुरुच आहे.
Havaman Andaj Maharashtra
सध्या परतीच्या वाटेवर निघालेला पाऊस कोकण व घाट परिसरात सक्रिय झाला आहे. गेल्या चार दिवसांत राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले असून.
पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर असाच कायम राहील. तर कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (Monsoon News)
काय म्हणाले पंजाबराव डख
राज्यात अजून काही दिवस पावसाचा जोर असाच राहणार आहे. राज्यात या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तर हा पाऊस किती दिवस असणार व कोणत्या जिल्ह्यांत पाऊस असणार जाणून घेणार आहोत. तसेच पंजाबराव डख यांनी सांगितलेला हवामान अंदाज जाणून घेऊ या..
एवढे दिवस असणार पाऊस..
हवामान खात्याचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी माहिती दिलीय. काही दिवसांपासून मुंबई, ठाणे परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या.
पुढील 2 ते 3 दिवस असाच पाऊस सुरू राहू शकतो. तसेच काळजी घेण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन के. एस. होसळीकर यांनी केले आहे. (Havaman Andaj Today)
या जिल्ह्यांत बरसणार पाऊस..
गुरुवार – मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्गात पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शुक्रवार – पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शनिवार – रायगड आणि रत्नागिरी वगळता पावसाचा जोर कमी होईल. ‘Panjabrao Dakh Havaman Andaj’
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, 15 ते 17 सप्टेंबर राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. डख यांच्या मते या कालावधीत मुंबई, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा.
जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली, इगतपुरी. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर निफाड या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.
पंजाब डख हवामान अंदाज
परंतु, 17 ते 20 तारखेपर्यंत राज्यात पाऊस पडेल मात्र पावसाचा जोर ओसरणार आहे. (Panjabrao Dakh Live) या दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. पुन्हा, 20 तारखेनंतर पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. 21 ते 24 सप्टेंबर राज्यात पुन्हा एकदा पाऊस सुरू होणार आहे.
📢 शेळी पालन 50% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा