Nuksan Bharpai Manjur Yadi :- नमस्कार सर्व शेतकऱ्यांना. मराठवाड्यातील शेत पिकांच्या झालेल्या नुकसानी करिता तसेच अतिवृष्टी पुरासह गोगलगाय मुळे तब्बल दहा लाख 81 हजार 761 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. आणि यांना नुकसान भरपाईची मागणी होत होती.
Nuksan Bharpai Manjur Yadi
दरम्यान सरकारने राज्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेल्या भागासाठी 3 हजार कोटी रुपयांची घोषणा ही केलेली आहे. आणि याबाबत मराठवाडा विभागासाठी 1106 कोटी रुपये प्राप्त झालेले आहे.
उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. अशी माहिती समोर येत आहे. कोणत्या जिल्ह्यासाठी किती नुकसान भरपाई आहे ?, या ठिकाणी आपण पाहणार आहोत. संभाजीनगर (औरंगाबाद) या जिल्ह्याला नुकसान भरपाई पासून वंचित या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे.
नुकसान भरपाई जिल्हानिहाय
सर्वप्रथम लातूर या जिल्ह्याच्या ठिकाणी पाहूया तर 49 हजार 160 ते शेतकऱ्यांना 37 कोटी 30 लाख 83 हजार रुपये मिळणार आहेत. तसेच नांदेडसाठी 7 लाख 41 हजार 946 शेतकऱ्यांना 717 कोटी 88 लाख 92 हजार रुपये रक्कम मिळणार आहे.
त्यानंतर जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामध्ये बाधित शेतकरी 6,898 तर यांना एकूण अनुदान 3 कोटी 71 लाख 84 हजार रुपये आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022
परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजेच 1557 शेतकऱ्यांना एक कोटी 60 लाख 34 हजार रुपये मिळणार आहे. आणि त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील 1 लाख 33 हजार 970 शेतकऱ्यांना 157 कोटी 4 लाख 52 हजार रुपये एवढा निधी मिळणार आहे.
नुकसान भरपाई पासून हा जिल्हा वगळला
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 75,739 शेतकऱ्यांना 90 कोटी 74 लाख 36 हजार रुपये मिळणार आहे. तर यामध्ये औरंगाबाद संभाजीनगर या जिल्ह्याला वगळण्यात आलेला आहे.
यावरती अजून नेमका अपडेट काय येईल हे पाहण्यासारखं आहे पण अद्याप अपडेट आलेलं नाही. संभाजीनगर साठी ते आपल्याला कळवण्यात येणार आहे.
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध करा अर्ज :- येथे पहा