Aajcha Hawaman Andaj Live :- नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रात पुढील दोन दिवसात मुसळधार पावसाचे असणार आहे. तर भारतीय हवामान खात्याने काय हवामान अंदाज वर्तवला आहे. ही संपूर्ण माहिती आपण लेखात जाणून घेऊयात. तर लेख नक्की शेवट पर्यंत पहा.
Aajcha Hawaman Andaj Live
महाराष्ट्रात पावसाचे आगमन कधी होणार. याचे वेढ सर्वांना लागले आहेत. अशात हवामान खात्याकडून राज्यात अनेक ठिकाणी अलर्ट देण्यात आले आहे. अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी माहिती दिली आहे. पुढच्या ३-४ तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, आणि कोकनातं काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Hawamana Andaj Today Live
येत्या ४, ५ दिवसांत (१७- २१ मे) दक्षिण मध्य महाराष्ट्र. दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी उत्तर मध्य महाराष्ट्र. आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कसा असेल पाऊस
महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत १७ ते १९ मे या कालावधीत विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली. नांदेड, लातूर, उस्मानाबाद या १३ जिल्ह्यांना यलो इशारा देण्यात आला आहे.
राज्यात कसा असेल पुढील हवामान अंदाज
20 मे नंतर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस
अनुराग कश्यपी यांनी सांगितले की, 26 मे ते जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. 20 मे नंतर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 26 मे पासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू होईल. मान्सूनचा विषुववृत्त प्रवाह मजबूत आहे आणि तो वेळेवर पोहोचेल अशी आशा आहे. महाराष्ट्रातील मान्सूनची नेमकी तारीख सांगणं शक्य नाही. मान्सूनची सुरुवात दरवर्षीच्या तारखांच्या आसपास असली तरी. महाराष्ट्राच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पाऊस लवकरच सुरू होईल.
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाइन फॉर्म सुरू :- येथे पहा माहिती
📢 शेळी पालन अनुदान योजना 2022 महाराष्ट्र ऑनलाईन फॉर्म सुरू :- येथे पहा