Aajche Kapus Bajar Bhav | कापूस बाजार भाव आजचा | आजचे कापूस बाजार भाव

Aajche Kapus Bajar Bhav | कापूस बाजार भाव आजचा | आजचे कापूस बाजार भाव

सर्वांना नमस्कार आजच्या लेखामध्ये आपण कापुस बाजार भाव हा कोणत्या बाजारपेठेमध्ये सर्वाधिक आहे हे जाणून घेणार

आहोत त्याचबरोबर कापूस बाजार भाव दिवसेंदिवस वाढतच आहे हे आपल्याला पाहायला मिळत असे मित्रांनो व्यापारी असेल

त्याच्या बरोबर बाजार समितीतील अधिकारी असतील यांच्या माहितीनुसार कापसाचा बाजार भाव हा दहा हजाराच्या वर

जाईल अशी माहिती येत आहेत.

कापूस बाजार भाव का वाढत आहे ?

महाराष्ट्र मध्ये आपल्याला कापसाचे कमी उत्पादन पाहायला मिळत आहे त्याचे मुख्य कारण मित्रांनो राज्यांमध्ये विविध

जिल्ह्यात अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे राज्यातील कापसाचे उत्पादनात घट

आली आहे त्यामुळे बाजारात जास्त मागणी होत असल्यामुळे कापसाच्या बाजार भाव मध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

खासगी व्यापारी व्यापारी मध्ये स्पर्धा सुरू असल्याने हा जास्त तर तो जास्त भावाने कापूस खरेदी करत आहे, तर सध्या 9 हजार

500 रु. पर्यंत भाव मिळाला आहे,

कापूस बाजार भाव आजचे

कापुस बाजार भाव मध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे तर 9 हजार 500 रुपये पर्यंत बाजार भाव हा सध्या मिळत आहे

आपण मागील लेखात पाहिले असेल तर त्यामध्ये आपण वाशीम जिल्ह्यात 9 हजार 100 रु. पर्यंत बाजार भाव मिळाल्याचे

आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून पाहिलं होतं.

Aajche Kapus Bajar Bhav 

सध्या ९ हजारांच्या आसपास कापसाचे भाव पोहोचले असल्याने, येत्या काही दिवसांत कापसाच्या भावात तेजी पाहायला

मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी वाढल्याने कापसाच्या भावात तेजी आली

आहे. येत्या काही दिवसांत कापसाच्या भावात तेजी येऊन त्याचा भाव १० हजारांच्या घरात जाण्याची शक्यता व्यापारी वर्गात

व्यक्त करण्यात येत आहे. कापसासोबत कापूस खरेदी करणाऱ्या फॅक्ट्रऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खरेदीत चांगलीच

स्पर्धा सुरू आहे. स्पर्धा शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरली ठरत आहे यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे, ज्या भावात तेजी, तसेच

तेथील भाव शेतकऱ्यांना योग्य वाटला, तेथे त्याची आवक वाढली. त्यामुळे विविध फॅक्ट्ररीत कापसाची आवक वाढली.

शेतमालाला तेजीचा भाव मिळू लागला. 

कापूस बाजार भाव किती वाढणार ?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत उत्पादन मात्र, कमी असल्याने कापसाच्या भावात यंदा

तेजी आली आहे. कापसाचे हे दर पाहता पुढील काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता बाजारपेठेत आहे. विनोद कोटेवार

सचिव आणि बाजार समिती आर्वी.

कापूस सर्वाधिक बाजार भाव कुठे ?

जिल्हा नांदेड तालुका किनवट या बाजारामध्ये कापसाला आज रोजी चांगला बाजारभाव मिळाला आहे आज कापुस बाजार

भाव दिनांक 06/11/2021 रोजी आवक 304 क्विंटल किमान दर 8500 रु. सर्वसाधारण दर 8300 रु. कमीत कमी दर

8000 हजार रुपये आज किनवट या बाजारामध्ये भाव मिळाला आहे.

📢 80% अनुदानावर ठिबक,सिंचन योजना सुरू:- येथे पहा

📢 40+2 बोकड योजना सुरू:- येथे पहा

Leave a Comment