Compensation for Snail Crops | गोगलगायमुळे पिकांचे नुकसान मिळणार भरपाई पहा हे परिपत्रक

Compensation for Snail Crops :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये महत्त्वाची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. आपलं गोगलगाय मुळे शेत पिकाचं नुकसान झालेला असेल. तर शेतकऱ्यांना मिळणार मदत तर याबाबतचा परिपत्रक याठिकाणी आलेला आहे. तर यंदाच्या पावसामुळे कोवळ्याकडे सोयाबीनचे पिकाचे मोठे प्रमाणात गोगलगाय चा प्रादुर्भाव झाल्याने शेत पिकांचे मोठे नुकसान झालेले आहेत.

Compensation for Snail Crops

यामध्येच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव देखील पाठवण्याची आदेश राज्य सरकारने दिलेले आहे. तर यामध्येच विरोधी पक्षनेते अजित पवार, धनंजय मुंडे, यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे मागणी केली होती. तर याच्याच मागणीला यश आलेल्या त्यानंतर गोगलगायीमुळे सर्वाधिक नुकसान बीड, लातूर, आणि उस्मानाबाद या भागात झाले होते. या जिल्ह्यासहित आणि काही भागातील एक लाख 63 हजार 889 हेक्टर क्षेत्र गोगलगायने बाधित झाले.

गोगलगाय पिकांचे नुकसान भरपाई

यामध्ये या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाने द्यावे. जे शेतकऱ्यांचे नुकसान 33% पेक्षा अधिक असेल त्यांनी मदतीसाठी प्रस्ताव शासन सादर करणे. जे निर्देश विभागीय आयुक्त व संबंधित जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. तर नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याच्या आदेश पारित केले होते. आणि यामुळे गोगलगायी ग्रस्त शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे.

गोगलगाय भरपाई मदत परिपत्रक 

या संदर्भातील परिपत्रक हे मदत व पुनर्वसन प्रभाग महसूल वन विभाग यांच्याकडून दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी या ठिकाणी निर्गमित केलेला आहे. आणि विषय आहे शंकी गोगलगायी मुळे शेत पिकांचे झालेले नुकसानीसाठी पंचनामे करून मदत देण्याबाबतचा हा परिपत्रक आहे. परिपत्रक चा फोटो आपण खाली पाहू शकता.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment