HDFC Bank

HDFC Bank दुचाकी चालवताना वाहन चालकाला संपूर्ण लक्ष दुचाकी चालवण्याकडे द्यावं लागतं. जराजरी दुर्लक्ष झालं तरी मोठा अनर्थ घडतो. दुलर्क्ष किंवा शुल्लक चुकांमुळे आजवर अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात बऱ्याच व्यक्तींनी आपला जीवही गमावला आहे. अशात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओपाहून यात अपघात घडण्याची शक्यता मोठी शक्यता दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/C3uXB6up9nW/?utm_source=ig_web_button_share_sheet

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बाईक हायवेला वेगात धावत आहे. त्यावर दुचाकी चालवणारा व्यक्तीच नाहीये. पण मागच्या सीटवर एक व्यक्ती एका बाजून पाय ठेवून बसला आहे. आता दुचाकी चालवताना तर कोणीही दिसत नाहीये. मात्र तरीही यावर मागे बसलेला हा व्यक्ती अगदी बिंधास्त आणि हासत खेळत यावर बसला आहे. पडण्याची आणि भीषण अपघात होण्याची जराही भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये.