Kanda Chal Yojana 2021 || Kanda Chal Anudan || कांदा चाळ आराखडा
नमस्कार, जाणून घेऊया कांदाचाळ अनुदान योजना विषयीची परिपूर्ण संपूर्ण माहिती यामध्ये कांदा चाळ ऑनलाईन अर्ज कोणते शेतकरी करू शकतात तसेच कांद्याचा साठी किती अनुदान हे शासन अंतर्गत दिला जातो त्याचबरोबर योजनेचे स्वरुप काय आहेत योजनेचे उद्देश या योजनेचे लाभार्थी संपूर्ण माहिती ही आजच्या लेखामध्ये मध्ये आपण पाहणार आहोत.
योजनेचे स्वरूप
कांदा चाळीचे बांधकाम ही आराखड्याप्रमाणे असणे बंधनकारक.
5,10,15,20,25 व 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाळी अनुदानाचा लाभ दिला जाईल,
कांदा पिका खालील क्षेत्र चा सातबारा उताऱ्यावर नोंद असणे.
बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विहित नमुन्यात प्रस्ताव संबंधित सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे दाखल करावा
वैयक्तिक शेतकऱ्यांना 100 मेट्रिक टन तर सहकारी संस्थांसाठी 500 मॅटिक टंचाई बांधण्याची तरतूद.
कांदाचाळ अनुदान योजनेसाठी कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज (सध्या Maha Dbt Portal वर ऑनलाईन अर्ज करू शकता)
- 5 ते 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळसाठी हेक्टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी 1 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असावे.
- अर्जदाराच्या नावे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक कांदा पिकाची नोंद असणारा सातबारा उताराची प्रत व 8 अ उतारा हा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- (महाडीबीटी पोर्टल वर देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू आहेत तिथून देखील आपण ऑनलाइन अर्ज करून अनुदानाचा लाभ घेऊ शकता)
- वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी देखील अनुदानास पात्र राहणार आहे. कांदाचाळीचा गैरवापर लाभार्थीकडून झाल्यास अनुदान दिलेल्या तारखेपासून व्याजासह वसुली लाभार्थ्यांकडून करण्यात येईल.
- लाभार्थींनी कांदा चाळ बांधण्यापूर्वी याबाबत करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात 20 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करावा लागणार आहे. तर (महाडीबीटी पोर्टल ऑनलाइन पद्धतीने कांद्याचा अनुदान घेण्यासाठी अर्ज आहे. यामध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ची सोडत होणार असून. आपल्या कांदा Chal Anudan साठी आपले कृषी अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील हे आपल्या थेट शेतामध्ये येऊन पाहणी करतील.
- अर्जासोबत खर्चाची मूळ बिले व घोषवारा हे आपल्याला जोडावे लागणार आहे, हे फक्त ऑफलाईन अर्ज करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आहे.
- कृषी विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला देखील आपल्याला जोडावा लागणार आहे.
- त्याचबरोबर अर्जदाराचा कांदाचाळी चा फोटो देखील आपल्याला जोडावे लागणार आहे.
- सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.
- 5 ते 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीचे अंदाजपत्रक आपण आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत ते आपण डाऊनलोड करून घ्यावेत.
लाभाचे स्वरूप
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 100 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी 1 लाख 50 हजार रुपये अनुदान दिले जाते तर इतर
सहकारी संस्था/ कृषी उत्पन्न बाजार समित्या/ कांदा उत्पादक सहकारी संस्था, यांना जास्तीत जास्त 500 मेट्रिक टन क्षमतेच्या
कांदा चाळीसाठी 7 लाख 50 हजार रुपये एवढे कांदा चाळीसाठी अनुदान दिलं जातं.
अर्ज सदर कुठे करावा ? Kanda Chal Yojana 2021
आपल्याला संपर्क करुन ऑफलाइन अर्ज पद्धतीने सादर करू शकतात. आपण ऑनलाइन पद्धतीने देखील कांदाचा साठी
ऑनलाईन महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करू शकतात. तो अर्ज कसा करायचा आहे त्यासंबंधीतील संपूर्ण A to Z माहिती
आपण त्याविषयी व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर आपण क्लिक करून तो व्हिडीओ पाहू शकता.
5 ते 50 MT अंदाज पत्रक (DPR) संपूर्ण काढण्यासाठी link:-
शेतीला ९०% अनुदानावर तार कुंपण योजना 2021 संपूर्ण माहिती येथे पहा
कांदा चाळ विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा video पहा