Kapus Pikavar Favarni | कापूस पिकावरील रोग,कीड यासाठी कोणती फवारणी करावी व किती मात्रा पहा सविस्तर माहिती

Kapus Pikavar Favarni :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आणि ही माहिती म्हणजे कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे. कापूस लागवड करून दुसरी फवारणीची वेळ आली आहे. तर अशात कोणत्या कीड किंवा रोगासाठी कोणती फवारणी करावी. किंवा कोणती खत हे फायदेशीर असेल फवारणी करतानी कशी फवारणी करायची आहे ?. म्हणजेच किती औषध टाकायचे आहे, याबाबत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया, हा लेख संपूर्ण वाचायचा आहे, आणि इतरांना शेअर करायचा आहे.

Kapus Pikavar Favarni

लाल्या लक्षणे:- कपाशीची पाने लाल होण्याचे मुख्य कारण नत्राची कमतरता होय. नत्र खतांच्या कमतरतेमुळे बोंड वाढीच्या अवस्थेमध्ये पानातील हरित द्रव्यामधील नत्र वापरले जाते आणि पाने लाल होतात. तसेच मॅग्नेशियम ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आणि रस शोषणा-या किडींच्या (मुख्यत्वे तुडतुडे) प्रादुर्भावामुळे सुध्दा कपाशीची पाने लाल होतात.

उपाय :- १) लाल्या प्रतिकारक वाणांची निवड करावी. २) शिफारसीत खतांच्या मात्रा द्याव्यात. बीटी वाणासाठी शिफारशी मात्रेपेक्षा २५ टक्के खत जास्त द्यावीत. त्यामध्ये २० टक्के नत्र लागवडीच्या वेळी, ४० टक्के नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी आणि ४० टक्के नत्र लागवडीच्या ६० दिवसांनी द्यावे, मॅग्नेशियमसारखे सूक्ष्म अन्नद्रव्य (२० ते ३० किलो/हे) जमिनीत द्यावे. वाढीच्या काळात २ टक्के डिएपी खतांच्या दोन फवारणी १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.

कापूस पिकावरील आकस्मिक मर रोग

लक्षणे  दिवसाचे तापमान ३८०  सें.पेक्षा जास्त दिर्घकाळ टिकून राहिल्यास तसेच पाण्याचा ताण बसल्यास आणि पावसाळ्यामध्ये पाणी साचून राहिल्यास कपाशीच्या शरीरक्रिया शास्त्रावर अनिष्ट परिणाम होतो. पाण्याचा ताण बसल्यामुळे अन्नद्रव्य शोषून घेणा-या जलवाहिन्या फुगीर बनतात आणि नलिका बंद होतात. झाडाच्या पाने, फुले व बोंडे यांना अन्नद्राव्य पुरवठा न झाल्यामुळे पानांचा तजेला नाहीसा होतो पाने पिवळी पडतात. पाने, फुले व बोंडे यांची गळ होते आणि झाड मरते.

उपाय :- वेळेवर पाणी द्यावे. (८-१० दिवसांच्या अंतराने) पाण्याच्या पाळ्यातील अंतर कमी जास्त करु नये २) पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी आणि साचलेले पाणी लगेच काढून द्यावे. ३) विकृतीग्रस्त झाडांना लक्षणे दिसू लागताच १.५ किलो युरिया + १.५ किलो पालाश १०० लिटर पाण्यात मिसळून १५० ते २०० मि.लि. द्यावे. ४) त्यानंतर ८-१० दिवसांनी २ किलो डिएपी १०० लिटर पाणयात मिसळून हे द्रावण १५० ते २०० मि.लि. झाडाच्या बुंध्याजवळ ओतावे व लगेच पाणी द्यावे.

पीक सरंक्षण कपाशीवरील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन

रोगाचे नावकधी दिसतो (पेरणीपासून दिवस)ओळखउपाय
बुरशीजन्य करपा  (अल्टरनेरिया ब्लाइट)७०-७५ दिवसपानावर व बोंडावर गोलाकार विटकरी किंवा काळ्या रंगाचे ठिपकेप्रॉपिकोन्याझोल (५०० मिली) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (१५०० ग्रॅ.) + स्ट्रेप्टोसायक्लीन (६० ग्रॅ.) ५०० लि. पाण्यात मिसळून १०-१५ दिवसाचे अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
जीवाणूजन्य करपा (बॅक्टेरिअल लीफ ब्लाइट)७५-८० दिवसपानावर गडद विटकरी रंगाचे कोनात्मक ठिपकेवरीलप्रमाणे
मर व मुळकूज (बिल्ट व रुट रॉट)उगवणीपासूनझाड वाळून जाते मुळे सडतात/कुजताततीन ग्रॅम प्रति किलोप्रमाणे थायरम किंवा ४ ग्रॅंम प्रति किलो प्रमाणे ट्रायकोडरमाची बीज प्रक्रिया करावी, रोग प्रतिकारक वाण वापरावे.

कपाशीवरील प्रमुख किडी व त्यांचे व्यवस्थापन

१) रसशोषक किडी

किडीचे नावकधी दिसतात  (पेरणीपासून दिवस)ओळखउपाय
मावा४५फिकट पिवळे/गर्द हिरवे/काळपट रंगाचे, साधारण २ मिमी लांब१)बीज प्रक्रिया –इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यू.एस ४ ग्रॅम किंवा कार्बोसल्फान २५ डी.एस ६० ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास        २) खोडप्रक्रिया – ऑक्सीडिमेटॉन मिथील २५ ई.सी. हे आंतरप्रवाही किटकनाशक १:४ या प्रमाणात पाण्यात मिसळून कपाशी पिकाच्या हिरव्या खोडावर मध्यभागी एका बाजूने ४-५ इंच भागावर लावावे.

३) ५ % निंबोळी अर्काची फवारणी.

४) क्रायसोपा अंडी ५०,०००/- प्रति हेक्टरी पिकावर सोडावीत.

५) डायमिथोएट ३० ई.सी १३ मिली ऑसिफेट ७५ एस.पी. १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

तुडतुडेउगवणीपासूनतिरके चालणारे, पंखविरहीत, हिरवट रंगाचे किडे, पानाखाली
फुलकिडे१ ते ३०पिल्ले आकाराने लहान, फिकट पिवळ्या रंगाचे, प्रौढ पिवळसर रंगाचेडायमेथोएट ३० ईसी १३ मिली, २५ ईसी किंवा फिप्रोनील ५ ई.सी. ३० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
पांढरीमाशी८०-११०पांढ-या रंगाची आकाराने लहान व दोन पंख असलेलीफवारणी – अॅसिटीमिप्रिड २० एस.पी . २ ग्रॅम किंवा – ट्रायझोफॉस ४० ई.सी ३५ मि.ली. किंवा बुप्रोकेजिन २५ ईसी २० मिली किंवा निंबोळी अर्क ५० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
पिठ्या ढेकूणपिकाच्या सर्व अवस्थाशरीरावर पांढरट मेणचट आवरण असते.व्हर्टिसिलीअम लेकानी ५० ग्रॅम किंवा ब्रुप्रोकेजिन २५ ईसी ३० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

बोंड अळी कोणती व कशी ओळखावी ? 

किडीचे नाव

कधी दिसतात (पेरणीपासून दिवस)

ओळख

उपाय

अमेरिकन बोंड अळी(हिरवी अळी)

४५-८५

अळी हिरव्या रंगाची असून, शरीरावर लांबीच्या बाजूने तुटक करड्या रेषा असतात. पतंग मोठ्या आकाराचा पिवळसर तपकिरी रंगाचा असतो.जैविक नियंत्रण

एच.एन.पी.व्ही ५०० एल.ई./हेक्टर

बी.टी.व्हार कुरस्टाकी १ किलो/हेक्टर

क्रायसोपा अंडी ५००००/हेक्टर,

फेरोमन सापळे हेक्टरी ५,

निंबोळी अर्क ५ टक्के फवारणी

रासायनिक नियंत्रण

  • लॅम्बाड सायहॅलोथ्रीन ५ टक्के ई.सी.८ मिली
  • स्पिनोसॅड ४५ एस.सी. ३.५ मिली किंवा
  • प्रोफेनोफॉस ५० ई.सी. २० मिली किंवा
  • इन्डोझॅकार्ब १५.८ ई.सी. ८ मिली किंवा
  • क्यलोरपायरीफॉस ५० ई.सी. २० मिली किंवा
  • क्विनॉलफॉस २० ई.सी. २० मिली १० लीटर पाण्यात मिसळून गरजेनुसार एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
ठिपक्याची बोंड अळी

३०-६५

अंगावर पांढरे ठिपके असतात ही तपकिरी रंगाची अळी १५-१८ मि.मी लांब असते.
शेंदरी बोंड अळी

७५-११०

शेंदरी रंगाची अळी साधारण १८-१९ मि.मी लांब असते. डोक्याजवळचा भाग काळपट रंगाचा असतो.
कापसाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन
  1. पेरणीच्या वेळी
बीज प्रक्रिया –इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यू, एस. १० ग्रॅम किंवा कार्ब्रासल्फान (मुग, उडीद, सोयाबीन व तूर) सापळा पिके म्हणून मका, चवळी, ज्वारी, राळा यांची लागवड करावी.
  1. पेरणीनंतर २१ ते ३० दिवसांनी रस शोषणा-या किडींसाठी फवारणी करावी. 
  1. क्रायसोपा अंडी ५००००/ हेक्टरी शेतामध्ये सोडवीत.
  2. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  3. डायमिथोएट ३० ईसी ८ मिली किंवा मेथील डिमेटॉन २० ई.सी. २४ मिली किंवा ऑसिफेट ७५ एस.पी १० लीटर प्रती पाण्यात मिसळून फवारावे.
  1. शेंडे अळी व बोंड अळीसाठी दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ ते २१ दिवसांनी करावी.
  1. बीटी कुरस्टाकी १ किलो/हेक्टरी फवारणी.
  2. ट्रायकोग्रामा अंडी १.५ लक्ष/हेक्टर
  3. फेरोमेन सापळे आणि पक्षी थांबे शेतामध्ये लावावेत.
  1. रस शोषणा-या किडीसाठी तिसरी फवारणी, दुस-या फवारणीनंतर १५ ते २१ दिवसांनी
  1. अॅसिटॅमिप्रिड २० एस.पी. २ ग्रॅम किंवा
  2. ट्रायकोग्रामा अंडी १.५ लक्ष/हेक्टर
  3. अॅसिफेट ७५ एस.पी. १० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
  1. सर्वप्रकारच्या बोंड अळ्या शेंडे अळी, अमेरिकन व शेंदरी बोंड अळी
एच.एन.पी.व्ही. ५०० एल.ई/हेक्टर लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ८ मि.ली. स्पिनोसॅड ४५ ई.सी. ३.५ मि.ली. किंवा १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
बोंडअळी नियंत्रणासाठी उपाय योजना 
  1. पीक साधारणपणे १ ते १.५ महिन्याचे असताना शेतात शेंडेअळीच्या प्रादुर्भाव आढळून येतो. किडग्रस्त शेंडे तोडून नाश करावा.
  2. संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करुन नयेय
  3. संश्लेषित पायरेथ्राईडच्या वापरानंतर दुसरी फवारणी अॅसिफेट/कार्बारील किंवा क्यॅुनॉलफॉसची करावी.
  4. अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी फवारावे.
  5. सर्व प्रकारच्या बोंडअळीसाठी बी.टी, हे जैविके अणुजीवयुक्त किटकनाशक वापरावे.
  6. अधुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत.
  7. कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णत: टाळावे.
  8. निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांच्या सुरुवातीच्या काळात वापर करावा.
  9. पॉवर पंप वापरताना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे.

उत्पादन – बागायती कपाशीच्या सुधारित वाणांचे हेक्टरी २० ते २४ क्विंटल तर संकरित वाणाचे हेक्टरी २५ ते ३० क्विंटल.


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment