Kharip Pik Vima 2021 पीक विम्याच्या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे पाहिलं तर 2021 मध्ये पावसाचा खंड त्याचबरोबर अतिवृष्टी असे विविध प्रकारच्या धोक्यामुळे
शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याच्यासाठी आपण पाहिलं खरीप हंगाम 2021 करतात शेतकऱ्यांनी या ठिकाणी पिक विमा साठी पात्र
ठरविण्यात आलेले. त्याच्यामध्ये आपण जर पहिल्या पावसाच्या खंडासाठी त्या जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढण्यात आलेल्या त्या त्या त्या जिल्ह्यामध्ये त्याच्या
पात्र मंडळाला 25 टक्के या ठिकाणी पीक विम्याचे वाटप केले जात आहे. त्यामुळे आपण यापूर्वी पाहिले होते की 73 टक्के चा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पीक
विम्याचे वाटप करण्यात आलेल्या आहे. परभणी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढून या पिक विमा ची सध्याची स्थिती काय आहे
याच्या बद्दल ची माहिती देण्यात आली आहे टी आपण पाहूयात.
खरीप पिक विमा 2021
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 स्थानिक नैसर्गीक आपत्ती याबाबी अंतर्गत परभणी जिल्ह्यातील एकुण 3,78,307 एवढ्या शेतकऱ्यांनी
विविध माध्यमातुन पिक विमा कंपनीकडे नुकसानीच्या पुर्वसुचना दाखल केल्या होत्या.
त्यापैकी 3,51,160 शेतकरी पिक विमा कंपनीने पात्र ठरवुन त्यांना एकुण 272 कोटी रुपये विमा मंजुर केला आहे. त्यापैकी दि.08/12/2021 रोजी पर्यंत पिक
विमा कंपनीने 2,86,012 शेतकन्यांना 247 कोटी पिक विमा वाटप केला. उर्वरीत पिक विमा वाटपाची प्रक्रिया विमाकंपनीकडुन चालु आहे.
परभणी खरीप पिक विमा माहिती
सदरील पिक विमा ज्याशेतकऱ्यांनी नुकसानीची पुर्वसुचना दिली होती त्यांना लागु झालेला आहे त्यामध्ये ज्या शेतकन्यांनी ज्या पिकासाठी तक्रार दिली होती.
त्यांना त्या पिकाच्या पिक वाढीची अवस्था, नुकसानीची टक्केवारी व पुर्वसुचना ज्यावेळी दिली त्या कालावधी नुसार पिक विमा वाटप होत आहे.
ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची पुर्वसुचना दिली नव्हती त्या शेतकऱ्यांना पिक कापणी प्रयोग आधारीत महसुल मंडळ निहाय नुकसान भरपाई लागु होणार.पिक
विमा वाटप करण्यात येईल नुकसानीची पुर्वसुचना दिलेल्या पात्र शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पिक विमा मिळालेला नाही.
त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा करण्याची प्रक्रिया सुरु असुन लवकरात लवकर पिक विमा त्यांच्या खात्यावर जमा होईल.
तरी विमा धारक (Kharip Pik Vima 2021) शेतकऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे हि विनंती.
📢 Pm किसान योजना ई-केवायसी करा तरच मिळणार हफ्ते : येथे पहा
📢 गाय/म्हैस 75% अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा