Kharip Pik Vima Yojana :- आनंदाची बातमी. खरीप २०२२ पीक विमा नुकसान भरपाईचे सुमारे २४१ कोटी रुपये शेतकरी बांधवांना उद्यापासून मिळायला सुरुवात होणार. खरीपाची नुकसान भरपाई नोव्हेंबर मध्येच मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचे विशेष आभार व्यक्त करतो. कागदपत्रांची पूर्तता झालेल्या पहिल्या टप्प्यातील शेतक ऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. खरीप २०२० संदर्भातील सुनावणी दि.०२/१२/२०२२ रोजी होणार असून त्याच दिवशी त्याबद्दल स्पष्टता येईल.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Kharip Pik Vima Yojana
जिल्ह्यातील अतिशहाण्या लोकप्रतिनिधींमुळे अधिक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र आपण व आपले वकील प्रयत्नशील आहेत. खरीप २०२१ संदर्भात सुद्धा उर्वरित ४०० कोटी रुपयांसाठी आपण काही बैठका घेतल्या आहेत.
व लवकरच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन विमा कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांना बोलावणार आहोत. खरीप २०२० चे ३५० कोटी रुपये व खरीप २०२१ चे ४०० कोटी रुपये म्हणजेच जवळपास एकूण ७५० कोटी रुपये आपले येणे बाकी आहे.
खरीप पिक विमा योजना
ते निश्चितच आपण मिळवून घेणार आहोतच. विज बिल संदर्भातही संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची सूचना दिली आहे, तरी कोणाला अडचण असल्यास त्यांनी संपर्क साधावा. तसेच आपल्याला शक्य असेल किंवा येणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेतून वीज बिल भरले तर अधिक संयुक्तिक ठरेल असे वाटते.
येथे क्लिक करून यादी डाउनलोड करा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा