Maharashtra Police Bharti 2022 :- राज्यामध्ये 2020 ची पोलीस भरती राज्य शासनाने यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. या शासन निर्णयाचे माध्यमातून 7231 रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. या बाबतचा जीआर आहे. यामध्ये महाराष्ट्र पोलीस शिपाई प्रवेश नियमांमध्ये सुधारणा केली आहे. आणि आता पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे. सर्व उमेदवारांना आनंदाची बातमी आहे. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.
Maharashtra Police Bharti 2022
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी अशी असेल. पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात येणारी शारीरिक चाचणी ही 50 गुणांची असणार आहे. यामध्ये 1-पुरुष उमेदवारसाठी– सोळाशे मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (पंधरा गुण), गोळा फेक( पंधरा गुण) असे पुरुष उमेदवारांसाठी मैदानी चाचणीचे स्वरूप असेल.
2- महिला उमेदवार– 800 मीटर धावणे( 20 गुण), 100 मीटर धावणे( पंधरा गुण), गोळा फेक( पंधरा गुण) असे एकंदरीत महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणीचे स्वरूप राहणार आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती 2022
त्यासोबतच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई( पुरुष ). पदासाठीच्या मैदानी चाचणी एकूण 100 गुणांची होणार असून यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 5 किमी धावणे( 50 गुण), 100 मीटर धावणे ( 25 गुण). गोळा फेक( 25 गुण)एकूण 100 गुण असणार आहेत.
सन २०२० मधील पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे भरण्यास संदर्भाधिन क्र.१ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली. असुन सदरची रिक्त पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून OMR पध्दतीने लेखी परीक्षा प्रक्रिया राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
हेही वाचा; SBI बँक घर बांधण्यासाठी देत आहेत कर्ज जाणून घ्या पात्रता
पोलीस भरती महाराष्ट्र 2022
OMR आधारीत लेखी परीक्षा प्रक्रिया राबविण्यासंदर्भात शासनाने दिलेल्या सुचना. आदेशांचा अवलंब करून सन २०२० मधील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही करावी. सदरहु परीक्षा पध्दतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचना / आदेशानुसार.
पोलीस महासंचालक यांनी पोलीस शिपाई भरतीबाबत सविस्तर परिपत्रक निर्गमित करून त्याबाबत घटकांना सुचना द्याव्यात. सदरची भरती पक्रिया पारदर्शीपणे राबविण्याची व सनियंत्रण करण्याची संपुर्ण जबाबदारी. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची राहील.
येथे पहा महाराष्ट्र पोलीस भर्ती जीआर
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती