Nuksan Bharpai Anudan :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखांमध्ये महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात शासनाने निर्णय जाहीर केलेला आहे. तरी यामध्ये कोणते पिकांसाठी किती भरपाई या ठिकाणी मिळेल ?, किती हेक्टरच्या मर्यादेमध्ये असेल. ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा, आपल्या जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याबाबत संपूर्ण माहिती समजून येईल.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Nuksan Bharpai Anudan
मुख्यमंत्री म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमध्ये यापूर्वी जिरायत शेतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टरऐवजी त्यात बदल करून 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर, बागायत शेतीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक शेतीसाठी 25 हजार रुपयांवरून ती आता 36 हजार रुपये प्रति हेक्टर मदत करण्यात आली आहे. यात 2 हेक्टरवरून 3 हेक्टर मर्यादा करण्यात आली आहे.
नुकसान भरपाई अनुदान GR
यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्याला जवळपास दुपटीने मदत होईल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या निर्णयाची अंमबजावणी करण्यात येत आहे. शेतकरी हितासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.
अतिवृष्टी नुकसान भरपाई
पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. त्यानंतरच यासाठी निधी वितरीत केल्यानंतर रक्कम आहरित करून लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करावी. सदर निधी अनावश्यकरित्या आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा.
येथे पहा शासन निर्णय pdf क्लिक करा
📢 शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन करिता 4700 कोटी रु. मंजूर येथे पहा हे अपडेट :- येथे क्लिक करा
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती