Sheli Palan Yojana Maharashtra योजनेचे नाव – अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे
10 Shelya 1 Bokad Yojana 2022
1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही .
2. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
3. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
लाभार्थी निवडीचे निकष – उतरत्या क्रमाने
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
- अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
- अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
- सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
- महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )
10 + 1 शेळी अनुदान किती व कसे ?
10 शेळ्या उस्मानाबादी संगमनेरी जातीच्या पैदाक्षम प्रती शेळी 8 हजार रुपये तर अशा एकूण दहा शेळ्यासाठी 80 हजार रुपयेत्याचबरोबर अन्य स्थानिक जातीच्या पैदाक्षम शेळ्यांसाठी प्रती शेळी 6 हजार रुपये अशा 10 शेळ्यांसाठी 60 हजार रुपये असा एकूण खर्च 10 शेळ्या आणि 1 बोकड घेण्यासाठी येतो त्यात लाभार्थ्यांना अनुदान किती मिळते ते आपण खाली पाहुयात त्याचबरोबर बोकड खरेदीसाठी उस्मानाबादी संगमनेरी जातीचा बोकड खरेदीसाठी 1 बोकड साठी 10 हजार रुपये खर्च येतो तर अन्य स्थानिक पैदासक्षम बोकड 8 हजार रुपये अशी प्रत्येक बोकड म्हणजेच बोकड साठी उस्मानाबादी संगमनेरी जातीचा नर rs.10000 आणि स्थानिक जातीचा बोकड असल्यास 8 हजार रुपये असे एकूण खर्च येतो तर त्याच मध्ये शेळ्यांचा व बोकडाचा तीन वर्षांसाठी एकूण उस्मानाबादी संगमनेरी जातींसाठी 13 हजार 545 रुपये आणि त्याचबरोबर स्थानिक जातीसाठी दहा हजार 221 रुपये विमा या ठिकाणी असणार आहे
शेळी पालन अनुदान तपशील
एकूण खर्च येतो आणि यामध्ये शेळ्या याचे व्यवस्थापन म्हणजे खाद्य असतील चाऱ्यावरील पाण्यावरील खर्च असेल हा लाभार्थी स्वतः करणे अपेक्षित आहे तर एकूण खर्च उस्मानाबादी संगमनेरी जातीच्या शेळ्या व बोकड साठी एक लाख तीन हजार 545 रुपये एकूण खर्च त्याचबरोबर स्थानिक जातीच्या शेळया व बोकड साठी 78 हजार 231 रुपये एकूण खर्च तर यामध्ये आता कोणत्या लाभार्थ्यांना किती अनुदान असेल व कसे मिळेल संपूर्ण माहिती पाहूया अनुसूचित जाती व जमातीतील प्रवर्गासाठी पुढील प्रमाणे अनुदान देय राहील
उस्मानाबादी संगमनेरी अनुदान योजना
उस्मानाबादी संगमनेरी बोकड व दहा शेळ्यांसाठी शासनाचे अनुदान असणार आहे 77 हजार 659 रुपये त्याचबरोबर लाभार्थ्यांचा स्वत हिस्सा यामध्ये असेल पंचवीस हजार 886 रुपये आणि दहा शेळ्या एक बोकड स्थानिक जातीच्या शेळ्यांसाठी अनुसूचित जाती व जमाती तील प्रवर्गासाठी एकूण अनुदान 58 हजार 673 रुपये लाभार्थी स्वतः हिस्सा 19500 58 रुपये तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना अनुदान उस्मानाबादी संगमनेरी शेळ्यांसाठी 51 हजार 773 रुपये लाभार्थी हिस्सा 51 हजार 773 रुपये तसेच अन्य स्थानिक जातींच्या शेळ्या बोकड साठी अनुदान 39 हजार 116 रुपये शासनाचे अनुदान लाभार्थी हिस्सा 39 हजार 115 रुपये अशाप्रकारे 10 शेळी एक बोकड त्यामध्ये उस्मानाबादी संगमनेरी आणि अन्य स्थानिक जातीच्या शेळ्यांसाठी वरील प्रकारे (Sheli Palan Yojana Maharashtra) अनुदान देय असेल लाभार्थ्यांसाठी असेल.
10 मेंढ्या 1 मेंढा अनुदान योजना 2022
दहा मेंढ्या खरेदी खर्च तपशील प्रति मेंढी माडग्याळ जातीच्या मेंढ्या प्रति दहा हजार रुपये अशा एकूण दहा मेंढ्यांसाठी रुपये एक लाख रुपये एकूण खर्च आणि याच बरोबर दख्खनी व अन्य स्थानिक जातीच्या मेंढी प्रति मेंढ्या 8 हजार रुपये अशा एकूण दहा मेंढ्या 80 हजार रुपये त्याचबरोबर नर मेंढा खरेदीसाठी माडग्याळ जातीचा एकूण बारा हजार रु. आणि दख्खनी व अन्य स्थानिक जातीचा नर मेंढा यासाठी दहा हजार रुपये असे एकूण खरेदी खर्च येतो त्याच बरोबर मेंढ्या व नर मेंढ्यांचा तीन वर्षासाठी चा विमा हा माडग्याळ जातीसाठी 16 हजार 850 रुपये त्याचबरोबर दख्खनी व अन्य स्थानिक जातीचा मेंढ्यांसाठी 13 हजार 545 रुपये असा विमा असणार आहे तर आता दहा मेंढ्या आणि एक नर मेंढ्या साठी कोणत्या लाभार्थ्यांना किती (Sheli Palan Yojana Maharashtra) अनुदान असेल खालील प्रकारे आपण पाहुयात
10 मेंढ्या 1 मेंढा योजना 2022
10 मेंढ्या 1 नर मेंढा माडग्याळ जातीचा एकूण अनुदान अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गासाठी 96 हजार 638 रुपये लाभार्थीस हिस्सा बत्तीस हजार 212 रुपये त्याचबरोबर सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण अनुदान 64 हजार 425 रुपये आणि स्वहिस्सा 64 हजार 425 रुपये त्याचबरोबर दखनी व अन्य स्थानीक जाती मेंढ्यांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग करीता एकूण अनुदान 51 हजार 773 रुपये रुपये लाभार्थी हिस्सा 51 हजार 772 रुपये अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गासाठी एकूण अनुदान 77 हजार 659 रुपये लाभार्थी हिस्सा 25 हजार 886 रुपये तर अशाप्रकारे अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गासाठी तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी दहा शेळ्या एक बोकड किंवा दहा मेंढ्या एक मेंढा अनुदानासाठी आपण अर्ज करू शकता आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा खाली दिलेल्या व्हिडीओ आपण पाहू शकता
शेळी/मेंढ्या अनुदान योजना कागदपत्रे
- फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
- सातबारा (अनिवार्य)
- ८ अ उतारा (अनिवार्य)
- अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
- ५) * आधारकार्ड (अनिवार्य )
- रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
- बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
- रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
- ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
- अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
- दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
- दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
- बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
- वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
- शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
- रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
- प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
📢 75% अनुदानावर कुकुट पालन अनुदान योजना सुरु :- येथे पहा
📢 40+2 शेळी पालन अनुदान योजना सुरु:- येथे पहा