Soybean Variety in Maharashtra :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती. आपण सोयाबीन ही पावसाळी लागवड करत असाल तर त्यात मोठा नुकसानहोत असते. तो म्हणजे पावसाळ्यात आपली सोयाबीन खराब होते. काळी पडत असते तर यासाठी कोणते वाण दमदार आहे. त्याच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. कोणते सोयाबीन चे वाण हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात. किंवा फायदे आहेत हे लेखात पाहूया तर लेख संपूर्ण वाचा.
Soybean Variety in Maharashtra
सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करण्यात व्यस्त आहे. आणि याबाबतच खरीप हंगाम महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार केला. तर खरिपामध्ये महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस ही दोन पिके प्रामुख्याने महाराष्ट्रात शेतकरी बांधव घेत असतात. आणि यामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश विभागामध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागा मध्ये पावसाचे प्रमाण हे वेगवेगळ्या प्रकारचे किंवा वेगवेगळे असते. तर या दृष्टिकोनातून शेतकरी सोयाबीन पिकाच्या जातीची निवड करत असतात. मागच्या वर्षी आपण पाहिले असेल की पाऊस जास्त अतिवृष्टीमुळे किंवा पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
सोयाबीन सुधारित वाण आजचे
याचाच विचार करून शेतकरी बांधवांना कोणती सोयाबीन साठी फायदेशीर ठरू शकतात. कोणते सोयाबीन बियाणे हे पावसाचा जोर प्रमाण आहे. हे मोठ्या प्रमाणात कंट्रोल करू शकते. या वाणाची नावे आहेत हे आपण या लेखात जाणून घेणारा सर्वाधिक उत्पन्न देखील देणारे वाण
तर याबाबत संपूर्ण माहिती खाली दिली आहे ती आपण नक्की पहा. तर खालील माहिती आपण जाणून घेणार आहोत. सोयाबीनचा जास्त पावसात टिकाव धरू शकणार या कोणत्या जाती आहेत याची माहिती या लेखात आपण जाणून घेऊया.
सोयाबीन सुधारित जाती
Js-9305 सोयाबीन वाण :- या वाणाची सोयाबीनचा जातीची शिफारस महाराष्ट्र साठी करण्यात आलेले आहे. ही जात अधिक उत्पादनासाठी उपयुक्त असून रोग व किडीस ही कमी बळी पडते व त्या वाहनांची एक खास ओळख आहे.
KDS-344 (फुले अग्रणी) ही वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहे. आणि आव्हाने चे प्रमुख वैशिष्ट्य आपण पाहिलं तर उत्पादनाच्या दृष्टीने सर्वात उत्कृष्ट असे हे फुले अग्रणी वाहन आहे. हे वाण शेंगा गळत नसल्याने उत्पन्न वाढीस उपयुक्त आहे आणि खरोखरच पण चांगले आहे.
JS-9705 सोयाबीन वाण:- वाणाची शिफारस महाराष्ट्रसाठी करण्यात आलेले आहे. लागवडीपासून 70 ते 75 दिवसांत पक्व होते. आणि एकरी उत्पादन याचा विचार केला तर तुलनेमध्ये अधिक उत्पादन देते. आणि या वाणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य अवर्षण व जास्त पाऊस या परिस्थितीत सुद्धा हे वाण चांगले येते. आणि याचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते.
सोयाबीन सुधारित वाण कोणते ?
फुले संगम-726 सोयाबीन वाण :- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेले वाहन आहे. जास्त उत्पादन तसेच काढण्याची वेळी शेंगा फुटत नसल्याने उत्पादन चांगले मिळते. आणि त्याचा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत नाही. तेव्हा या कारणांमुळे महाराष्ट्रात लोकप्रिय (फुले संगम सोयाबीन बियाणे) झालेलं वान आहे.
MAUS-612 माऊस 612 वाण:- दर्जेदार बियाणे असलेले पान इतर जातीच्या तुलनेत एकरी उत्पादन जास्त येते. आणि या वाणाची सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्ये किमान अवर्षण व जास्त पाऊस असून सुद्धा चांगल्या प्रमाणात उत्पन्न देते.
MAUS-162 वाण:- एकरी अधिक उत्पादन देते. आणि वाढताना सरळ उंच वाढते. सोयाबीनचे काढणी यंत्राने काढण्यासाठी हे वाण उपयुक्त आहे. म्हणून याची ओळख महाराष्ट्रात आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
DS-228 फुले कल्याणी वाण :- हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर यांनी विकसित केलेले वाण आहे. या वाणाची उत्पादन क्षमता अधिक असून ज्या ठिकाणी पाण्याची सोय चांगली आहे. तर पेरणीसाठी उपयुक्त असून ते उशिरा येणारे वाहन सुद्धा आहे.
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा