Vidhwa Pension Online Form | विधवा पेंशन | विधवा पेंशन योजना महाराष्ट्र Form

Vidhwa Pension Online Form :- नमस्कार सर्वांना आजच्या लेखामध्ये राज्यातील दारिद्र्य रेषेखालील असलेल्या सर्व विवाहित महिलां साठी पेन्शन योजने बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे. त्यासाठी पात्रता कागदपत्रे याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिलेली आहे.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचे फायदे

जर एखाद्या स्त्रीला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर कोणताही आधार नसतो. त्यामुळे त्यांचे जीवन बिकट होते. हे लक्षात घेऊन सरकारने त्यांच्यासाठी ही योजना सुरू केली. आम्ही आमच्या लेखाद्वारे या योजनेचे फायदे आणि उद्दिष्टे सांगणार आहोत, योजनेचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

  • या योजनेंतर्गत विधवा महिलांना सरकार दरमहा ६०० रुपये देणार आहे.
  • जर एखाद्या महिलेला एकापेक्षा जास्त मुले असतील तर तिला दरमहा 900 रुपये दिले जातील, जेणेकरून ती आपल्या मुलाची सहज काळजी घेऊ शकेल.
  • पेन्शन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2,000 पेक्षा जास्त नसावे.
  • योजनेंतर्गत मिळणारी पेन्शनची रक्कम दरमहा महिलेच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
  • महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी शासनाने २३ लाखांचा अर्थसंकल्प तयार केला आहे.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचे कागदपत्रे 

  1. महिलेकडे स्वतःचे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
  2. विधवा महिलेच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  3. वय प्रमाणपत्र 
  4. महिलेचे बँक खाते आणि बँक पासबुक असणे आवश्यक आहे.
  5. राज्य अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
  6. उत्पन्न प्रमाणपत्र असणे
  7. अर्जदार महिला अनुसूचित जाती, मागासवर्गीय असल्यास, त्यांचे जात प्रमाणपत्र आवश्यक
  8. महिलेचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  9. नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अनिवार्य आहे

विधवा पेन्शन योजनेसाठी पात्रता ? 

  1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.
  2. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी असावे.
  3. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु.२१,००० पेक्षा जास्त नसावे.
  4.  अर्जदाराचे बँक खाते आसावे आणि बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे गरजेचे आहे.
  5. दारिद्र्य रेषेखालील सर्व विधवा महिला सदर योजनेसाठी अर्ज करू शकतात.

https://chat.whatsapp.com/Dt918p2q6lkFMPvVKZBXxt

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा   

विधवा पेन्शन योजनेच्या अटी/शर्ती

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत रु.400/- प्रतीमहा असे एकूण रु.600/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय आहे

विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा ? 

अर्ज करण्याची पध्दत :-अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो. राज्यातील विधवा महिलांसाठी पेन्शन योजना राज्य सरकारने व केंद्र सरकार ही योजना राबवते येते. सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 600 रुपये प्रतिमहा निवृत्ती वेतन अनुदान दिले जाते. तरी या योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा लागतो.

अर्जाचा फॉर्म आपल्याला कुठे मिळेल याबाबत संपूर्ण माहिती तसेच अर्ज फॉर्मची लिंक पुढे दिलेले आहेत. त्या ठिकाणी फॉर्म डाऊनलोड करून प्रिंट काढून फॉर्म भरून आपल्याला जे आपल्या नजीकच्या जसे. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, किंवा तलाठी कार्यालय, या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे.

त्या अर्जावर (फॉर्म) कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते देखील माहिती ते अर्जाद्वारे दिलेले आहेत. ते कागदपत्र आपल्याला लागणार आहे. (Vidhwa Pension Online Form) अर्ज डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा

 महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना 2022 फॉर्म डाउनलोड लिंक :- येथे पहा 


📢 वार्षिक 6 हजार योजना सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment