Kusum Solar Pump Schemes :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा दिलासा देणारा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत हा नवीन जीआर निर्गमित केलेला आहे.
आता तब्बल 46 हजार 997 शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार आहे. कोणत्या प्रवर्गातील किती शेतकऱ्यांना हा पंप मिळणार आहे ?, याबाबत हा शासन निर्णय व याबाबत संपूर्ण माहिती लेखनामध्ये पाहणार आहोत.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Kusum Solar Pump Schemes
त्यासाठीच ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. कागदपत्रे व इतर ही सविस्तर माहिती आहे, ही आपण पाहणार आहोत. कुसुम सोलर पंप योजनेचा दुसरा टप्पा अंतर्गत 50 हजार सौर कृषी पंप स्थापित करण्यात शासनाचे मान्यता देण्यात आली होती.
त्यानंतर 13 एप्रिल 2022 रोजी 14 पुरवठा दरांना कार्यादेश निर्गमित करण्यात आले होते. आता कुसुम सोलर टप्पा दोन अंतर्गत 46 हजार 997 लाभार्थ्यांना सोलर पंप मिळणार आहे.
सोलर पंप अनुदान योजना
त्यातील सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्यांसाठी 26399 पंप. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे लाभार्थ्यांसाठी 2842 पंप. तसेच आदिवासी विकास विभागातील शेतकऱ्यांसाठी 539 पंप करण्यात येणार आहे.
अशा प्रकारे हे पंपांना या ठिकाणी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे. अशा शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार आहे.
येथे क्लिक करून सोलर पंप कोटा उपलब्ध चेक करा
पीएम कुसुम सोलर पंप योजना
सौर कृषी पंप योजनेअंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना. अंतर्गत अनुसूचित जमाती व जाती या प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 95% अनुदान देण्यात येते. तर 5% उर्वरित हिस्सा हा लाभार्थीने भरावा लागतो.
तसेच सर्वसाधारण व इतर प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 90% अनुदान हे शासनाकडून देण्यात येते. उर्वरित दहा टक्के स्वतः भरावा लागतो. अशा प्रकारे हा शासन निर्णय आहे. हा शासन निर्णय आपल्याला हवा असल्यास खालील दिलेल्या माहिती वर उपलब्ध आहे.
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा