Kisan Credit Card Yojana | किसान क्रेडीट कार्ड मोहीम सुरु लगेच मिळणार क्रेडीट कार्ड असे करा लगेच अर्ज

Kisan Credit Card Yojana : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी बंधुनो आपल्याला माहीतच असेल की यंदाचा खरीप हंगाम लवकरच सुरू होणार आहे. आणि यासाठी शेतकरी आतापासूनच तयारीला लागले आहेत. म्हणजेच खत बियाणे खरेदी करण्यासाठी कर्ज हे घेऊ इच्छित असतात. तर आता केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजनाही सुरू केली आहे. तिलाच आपण किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणतो. आणि याची खास करून मोहीम सुरू केली आहे. तर या मोहिमेमध्ये शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड ही दिला जाणार आहे. तर कोणत्या शेतकऱ्यांनी क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे कसे दिले जाणार आहे. याची ही मोहीम नेमकी काय आहे. संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Kisan Credit Card Yojana

सदर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना. किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची ही मोहीम सुरू करण्यात आलेले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा अंतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून देशभरात राबविण्यात येणार आहे. ही मोहीम राज्यांमध्ये तसेच देशात 24/04/2022  ते 01/05 /2022 या कालावधीत देशभर राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेअंतर्गत जे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अर्थातच केसीसी कार्ड हे दिले जाणार आहे. आणि या संदर्भातील ही मोहीम विशेष मोहीम आहे. आपण सर्व शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड घेणे आवश्यक आहे.

किसान क्रेडीट कार्ड कसे मिळेल ? 

आपलं पीएम किसान चा ज्या बँकेत खात आहे. म्हणजे ती बँक आपण लिंक केलेली आहे. तर अशा बँकेत किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याचा विहित कार्यपद्धतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज. विशेष ग्रामसभेत घेऊन दिनांक 01/05/2022 पर्यंत त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्याची कार्यवाही ही देखील पूर्ण करायचे आहेत. तर 1 मे 2022 पर्यंत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्याचे आदेश देखील माननीय आयुक्त यांनी दिलेले आहेत. आपल्या ग्रामपंचायत मध्ये संपर्क करावा लागेल.


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

Leave a Comment