Kusum Solar Pump Yojana 2022 | कुसुम सोलर पंपचा नवीन कोटा आला करा अर्ज

Kusum Solar Pump Yojana 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. केंद्र शासनाने शेतकरी बांधवांसाठी विजे पासून सुटका केलेली आहे. म्हणजेच सौर पंप अर्थातच त्यालाच आपण म्हणू शकतो कुसुम सोलर पंप योजना ही योजना. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर यामध्ये 90% ते 95% टक्के अनुदानावर आपण 3 एचपी ते 7.5 Hp करिता अनुदान घेऊ शकता. 90 ते 95 टक्के अनुदान आहे तर या यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. यामध्ये संपूर्ण माहिती या लेखात आपण दिलेले आहे. किती शेतजमीन धारकास किती Hp चा पंप दिला जातो. किंवा कोणत्या प्रवर्गासाठी किती अनुदान दिलं जातं तर त्यासाठी अर्ज कसा करायचा. कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे. या योजनेचे फायदे काय आहे संपूर्ण माहिती या लेखात आपण दिलेली आहे. जेणेकरून संपूर्ण माहिती वाचा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा.

Kusum Solar Pump Yojana 2022

प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत 90 ते 95 टक्के अनुदान दिलं जातं. तर आपण वरील माहिती मध्ये पाहिले की कोणत्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान आहे. तर आता जाणून घेऊया किती किती जमीन असलेल्या शेतकऱ्यांना किती एचपीचा पंप हा दिला जाणार आहे. तर सर्वप्रथम 2.5 एकर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 3 एचपीचा पंप दिल्या जाणार आहेत. तसेच 5 एकर शेतजमीन धारकास 5 एचपी पंप दिले जाणार आहे. आणि त्यापेक्षा जास्त जमीन धारकास 7.5 एचपी चा पंप दिला जातो. आणि यासाठी 90  ते 95 टक्के अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येते.

Kusum Solar Pump Yojana 2022

आहो ऐका :- शेळी पालन शेड 100% अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु, पण अगोदर हा पहा शासन निर्णय 

PM कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ 

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही एक केंद्र सरकारची योजना आहे. सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95% अनुदान दिले जाते. तर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदान मिळते. तर या योजनेचा फायदा असा आहे. तर आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी विजेची गरज आता नाही. आपण सोलर ऊर्जा वर मोटार चालू शकता. शेतकऱ्यांनो आणि यामध्ये कोणत्या प्रकारचे लोडशेडिंग, व अन्य प्रोब्लेम येत नाही. आणि शेतकऱ्यांची आर्थिक बचत होते.

पीएम कुसुम सोलर पंप योजना कागदपत्रे 

सोलार पंप योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे आवश्यक आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम सातबारा त्याचं विहीर. किंवा कूपनलिकांचा शेतात असल्याचा सातबार्यावर नोंद आवश्यक आहे. तसेच भोगवटदाराचे ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयांचा मुद्रांक कागदावर आवश्यक आहे. तसेच भोगवटदाराचे ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयांचा मुद्रांक कागदावर सादर करावा लागणार आहे. व आधार कार्ड झेरॉक्स प्रत लागणार आहे. तसेच रद्द केलेले धनादेश किंवा बँक पासबुक झेरॉक्स प्रत लागणार आहे. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र लागणार आहे. शेत जमीन विहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यास त्याच्या भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र. इत्यादी कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करण्यास आवश्यक आहे.

आहो ऐकलंय का ? कुकुट पालन 50% अनुदान योजना 2022 सुरु येथे जाणून घ्या लगेच खरी माहिती


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 शेळी पालन अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

Leave a Comment