Kharip Pik Vima 2022 List | या जिल्ह्यातील खरीप पिक विमा 510 कोटी रु. विमा मिळणार

Kharip Pik Vima 2022 List :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यातील तीन लाख 57 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2020 चा पिक विमा मंजूर झाला आहे. यामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पाठपुरावा केल्यानंतर विमा कंपनीने एकूण 510 कोटी रुपये विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि यालाच कोर्टाने आदेश दिले आहेत. सात दिवसाच्या आत पैसे जमा करावे लागणार आहे. असा आदेश दिला आहे त्या बाबतीत कोणता जिल्हा आहेकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे. या बाबतीतली संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.

Kharip Pik Vima 2022 List

आता त्यांना खरीप 2020 या वर्षाची पीक विम्याची रक्कम मिळणार. असून येणाऱ्या सहा आठवड्यात कंपनीने जर ही रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही तर ते राज्य सरकारला द्यावी लागेल. असे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. याबाबतीत उच्च न्यायालयामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले ते म्हणजे 72 तासांची अट हा पहिला मुद्दा होता. नुकसानीनंतर 72 तासानंतर काही शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती दिली होती. त्यांनाही न्याय मिळावा तसेच  33 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना राज्य सरकार आणि कृषी विभागाने मदत मिळेल असे सांगितले होते. कुठल्याही प्रकारची अशी मदत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे पाटील यांनी सांगितले. याबाबतीत वारंवार मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना सांगितले असून तरी देखील ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नसल्याचे देखील पाटील यांनी सांगितले आहे.

kharip pik vima 2020 osmanabad

याबाबतीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती व या याचिकेवर सुनावणी घेत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 510 कोटी रुपयांचा पिक विमा मिळणार आहे. शेतकऱ्यांची ही मागणी न्याय्य असून शेतकऱ्यांच्या बाजूने कोर्टाने निर्णय दिला आहे. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके उडवत एकमेकांना पेढे भरवले. भाजपच्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा हा लढा यशस्वी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले या बाबतीत महाराष्ट्र सरकारकडे, मुख्यमंत्री तसेच कृषी मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र यासंबंधी राज्य सरकारने पीक विम्याची बाबतीत कुठल्याही प्रकारचे सकारात्मक पाऊल उचलले नसल्याचे ठिकाण देखील भाजप कार्यकर्त्यांनी केली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रयत्न केले व त्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. योजना 2022 :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment