Rojgar Hami Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये महत्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध योजना या 2022 करिता अर्ज सुरू झालेले आहे. (Agriculture Development Programme) तर यासाठी कोणकोणत्या योजना या रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवल्या जाणार आहेत, त्यासाठी शंभर टक्के अनुदान आहे. परंतु याचा लाभ कसा घ्यायचा आहे ?, याविषयीची सविस्तर माहिती आहे हे आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण आपल्याला वाचायचा आहे. आणि आपल्या इतर जे बांधव आहेत शेतकरी आहेत यांना हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून त्यांना या संदर्भातील माहिती होईल.
Rojgar Hami Yojana
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2022-23 अंतर्गत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या फळबाग/ फुलपिके लागवड, व्हर्मी कंपोष्ट, नाडेप कंपोष्ट व शेततळे या घटकांसाठी अनुदानाचा लाभ होण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत. मागेल त्याला काम देणे व गावामध्ये आर्थिक समृध्दी आणणे हे मनरेगा योजनेचे उद्दिष्ट्य असून यासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार जॉबकार्ड धारक असावा.
Agriculture Development Programme
अर्जदार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसुचित जमाती (विमुक्त जमाती), दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे. स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना. अनुसुचित जमातीचे व इतर पारंपारिक वनवासी या सर्वांना प्राधान्यक्रम दिल्यानंतर कृषि कर्ज माफी योजना, अल्प भूधारक व सीमांत भूधारक यांना प्राधान्य देण्यात यावे. अर्जदाराची जमिन (0.05 हेक्टर ते जास्तीत-जास्त 2 हेक्टर पर्यंत) असणे आवश्यक.
रोजगार हमी कागदपत्रे आवश्यक
- खालील कागदपत्रे आवश्यक असून अर्ज गावातील ग्रामपंचायतीमध्ये जमा करावे.
- १) सातबारा उतारा 7/12
- 2) 8-अ उतारा
- 3) आधारकार्ड
- ४) बँक पासबुक
- ५) जॉब कार्ड
मनरेगा अनुदान योजना 2022 अर्ज
अनुदान: मनरेगा अंतर्गत व्हर्मी कंपोष्ट. नाडेप कंपोष्ट. शेततळे व फळबाग/ फुलपिके ही कामे मंजुर आहेत. त्यानुसार खालील प्रमाणे अनुदान राहील. 1) व्हर्मी कंपोष्ट- रक्कम रुपये 11 हजार 944 प्रति युनिट, 2) नाडेप कंपोष्ट – रक्कम रुपये 10 हजार 537 प्रति युनिट, 4) शेततळे आकारमानानुसार रक्कम रुपये 60 हजार ते रक्कम रुपये 3 लाख पर्यंत. 5) फळबाग/ फुलपिके – जास्तीत जास्त रक्कम रुपये 2 लाख प्रति हेक्टर याप्रमाणे. मनरेगा रोजगार हमी योजनेत अंतर्भुत फळपिके. आणि फुलपिके: मनरेगा रोजगार हमी योजनेत अंतर्भुत फळपिके आणि फुलपिके खालील प्रमाणे आहेत.
फळपिक अनुदान योजना मनरेगा
फळपिके वृक्ष – आंबा, काजू, चिकू, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिंच, सिताफळ, आवळा, नारळ, बोर, कवठ, रबर, महारुख. मँजियम, ऐन, शिसव, निलगिरी, गुलमोहर, महुआ, चिनार,जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, साग, सुपारी, कडीपत्ता,कडुलिंब, शेवगा, केळी. ड्रॅगन फ्रुट, करवंद, तुती, जड्रोफा, गिरीपुष्प. Agriculture Development Programme पानपिंपरी, द्राक्ष, चंदन, खाया, निम, चारोली, महोगनी, बाभुळ, अंजन, खैर, ताड, सुरु,शिरीष, बांबू व औषधी वनस्पती इत्यादी. फुलपिके – गुलाब, मोगरा, निशीगंध व सोनचाफा.
अनुदानातील काही महत्वाच्या बाबी आणि वैशिष्टे
- शेतकऱ्यांसाठी जमीन तयार करणे
- खड्डे तयार करणे
- कांड्या / कलमांची बीले व नांगी भरणे
- खते उपलब्ध करून देणे
- आंतरमशागतीसाठी मदत करणे
- पीक संरक्षण व पाणी देणे इ.
या योजनेचे सर्व अनुदान कसे मिळेल ?
हे अनुदान शेतकऱ्याला किवा रोजगाराला बँक खात्यात जमा करण्यात येते. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तुमच्या तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. कुटुंबाची जॉब कार्ड साठी नोंदणीसाठी कराव्याचा अर्ज नमुना नंबर 1 डाऊनलोड. करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती डाऊनलोड करू शकता.
येथे डाउनलोड करा फॉर्म
तसेच काम मागणीचा अर्ज आपल्याला करावयाचा असेल तर क्रमांक 4 डाउनलोड आपल्याला करायची लिंक खाली देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी माहिती पाहू शकता.
📢 नवीन सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा