Bambu Lagwad Yojana 2022 : नमस्कार सर्वांना शेत जमीन धारण अर्थातच शेतकरी म्हणून सिटी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यांमध्ये नवीन बांबू लागवड अनुदान योजना सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 50% ते 80% टक्के पर्यंत अनुदान थेट लाभार्थ्यांच्या दिले जाणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. या योजनेसाठी अर्ज कसे करायचे या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात.या योजनेच्या अटी व शर्ती संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेऊया. हा लेख संपूर्ण पहा.
महाराष्ट्र बांबू लागवडीसाठी अनुदान
बांबू लागवडीमुळे शोतक-यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचविण्यास मदत होणार आहे. राज्यांमध्ये बांबूची टिश्यू कल्चर रोपे उपलब्ध होतात. शेतक-यांना होत असून जमिनीवर तसेच शेताच्या बांधावर लागवडीकरिता सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. सदर योजनेला दिनांक २७ जून २०१९ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली आहे. शेतक-यांना सवलतीच्या दराने टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यासाठी नवीन योजना सुरु करण्यात आली आहे.
80% अनुदानावर ठिबक,तुषार योजना 2022 सुरु
टिश्यू कल्चर बांबू रोपे जाती
महाराष्ट्रामध्ये मानवेल, कटांग, या प्रजाती विदर्भ क्षेत्रात तर माणगा (Oxytenenthara stocksii) ही प्रजाती कोकण क्षेत्रात मोठया प्रमाणात आढळून येते. बांबू क्षेत्रात ब-याच वर्षापासून काम करणा-या तज्ञांसोबत चर्चा करुन वरील ३ स्थानिक प्रजाती व्यतिरिक्त खालील ५ प्रजाती निवडण्यात आलेल्या आहेत.
- Bambusa balcooa
- Dendrocalamus brandisii
- Bambusa nutan
- Dendrocalamus asper
- Bambusa tulda
राष्ट्रीय बांबू अभियानाच्या व्यापारिक दृष्टिकोनानुसार शेतक-यांच्या शहोतामध्ये लागवड योग्य ५ प्रजातीपैकी पहिले ४ मोठे बांबू असून त्यांच्यापासून बायोमास चांगल्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे. Bambusa tulda ही प्रजाती अगरबत्ती व इतर हस्तकला कामासाठी उपयुक्त प्रजाती आहे.
100% अनुदानावर सोलर पंप योजना 2022 सुरु
टिश्यू कल्चर बांबू अनुदान योजना 2022
टिश्यू कल्चर बांबू रोपांचा दर अंदाजे रु. २५/- प्रती रोप आहे. शेतकरी बांबू रोपे अगोदर खरेदी करुन त्याचे होत जमिनीवर लागवड करतील. जमिनीवर केलेल्या बांबू लागवडीचे तपासणीनंतर बांबू रोपांचे किंमतीपैकी शासनाकडून ४ हेक्टर. किंवा त्याखालील शेती असलेल्या भूधारकांना ८० टक्के तर ४ हेक्टरपेक्षा अधिक असलेल्या भूधारकांना ५० टक्के सवलतीच्या दराने (सबसिडी) त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येईल. तसेच उर्वरित बांबू रोपांची किंमत अनुक्रमे २० व ५० टक्के प्रमाणे खर्च हा शेतकऱयांनी स्वत: करावयाचा आहे.
100% अनुदानावर नवीन विहीर योजना 2022 सुरु
बांबू लागवड योजना कागदपत्रे 2022
लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहे. शेतकऱयांनी सवलतीच्या दराने बांबू रोपे. मिळण्यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने विहीत केलेल्या नमुन्यात खालील दस्तावेजासह अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
- शेतीचा गाव नमूना ७/१२
- गाव नमूना आठ
- गाव नकाशाची प्रत.
- ग्राम पंचायत / नगरपरिषद / नगरपंचायत यांचेकडून रहिवासी असल्याबाबतचा दाखला.
- बांबू लागवड करावयाच्या शेतामध्ये बांबूचे अपेक्षित उत्पन्न मिळण्यासाठी ठिबक सिंचन व बांबू रोपे लहान असतांना डूकरापासून रोपे सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षक कुंपणाची सोय असल्याबाबतचे हमीपत्र.
- आधार कार्डची प्रत
- बँक खात्याचा तपशील व पासबुकची प्रत/कोर्या धनादेशाची छायांकित प्रत.
- अर्जदार शोतकऱ्याने त्याचे बँकेचे खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक राहील आणि त्याकरीता त्याने बँकेला दिलेल्या पत्राची व बँकेकडून मिळालेल्या पोहोच पावतीची प्रत.
- शेतामध्ये विहीर/शेततळे/बोअरवेल असल्याबाबतचे विहीत प्रपत्रात हमीपत्र.
- बांबू रोपांची निगा राखणे व संरक्षण करण्यासंदर्भात विहीत प्रपत्रात हमीपत्र/बंधपत्र.
- जिओ टॅग / जीआयएसद्वारे फोटो पाठविण्याबाबत हमीपत्र.
- ज्या जमिनीवर तसेच शोताच्या बांधावर बांबू लागवड करावयाची ते क्षेत्र नकाशावर हिरव्या रंगाने दर्शविणे.
200 गाई पालन 2 कोटी योजना केंद्र सरकारची योजना 2022 सुरु
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ
बांबू लागवड करण्याकरिता वृत्तपत्रात व्यापक प्रसिध्दी देऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येणार आहे. जे होतकरी ऑनलाईन अर्ज सादर करु शकणार नाहीत, ते त्यांचे क्षेत्रातील संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक ) यांचे कार्यालयात लेखी अर्ज सादर करु डठाकतील. शेतकऱयांची निवड करताना लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास “ सोडत ” पध्दतीने अर्जदारांची निवड करण्यात येईल.अटी पूर्ण न झाल्यास, अर्ज नाकारण्याचा (Bambu Lagwad Yojana 2022) अधिकार महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर राहील.
ज्या अर्जदाराची वरीलप्रमाणे निवड होईल त्यास महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून निवडीबाबतचे पत्र देण्यात येईल. त्यानंतर अर्जदाराने महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने प्रमाणितकेलेल्या रोपवाटिकेतून रोपांची खरेदी करुन लागवड करणे आवश्यक आहे. तदनंतर अर्जदाराने महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडे अनुदानाची मागणी करावी. महाराष्ट्र बांबू विकास मंडळ/ वन विभागाकडून लागवडीच्या पाहणीनंतर विहित पध्दतीने अर्जदारास अनुदानाचे वाटप करण्यात येईल. वरील पध्दतीने निवड झालेल्या अर्जदाराव्यतिरिक्त अन्य अर्जदाराने बांबूची लागवड केली असल्यास त्यास अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.
📢 बांबू लागवड योजना ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा व्हिडीओ
📢 कुकुट पालन योजना 2022 सुरु :- येथे पहा