How to Download Old Ferfar : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या लेखात जाणून घेणार आहोत. तर 1980 पासून चे सर्व शेती संबंधीतील सर्व जुनी कागदपत्रे जसे जुने फेरफार, जुने सातबारा उतारा, (june satbare kase kadave) ही संपूर्ण कागदपत्रे. आपल्या मोबाईल वर काढण्यासाठी सरकारने नवीन पोर्टल सुरू केलेले आहे. तरी यापोर्टलच्या माध्यमातून आपण जमिनीसंबंधीतील जुने उतारे, फेरफार सातबारा इत्यादी. अशा प्रकारचे सर्व 64 प्रकारचे कागदपत्रे ऑनलाइन आपण काढू शकता. ऑनलाइन पद्धतीने कसे काढायचे त्या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखात पहाणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
How to Download Old Ferfar
- जुने फेरफार व जुने सातबारा नवीन नोंदणी पद्धत
- Aapleabhilekh.mahabhumi.gov.in ही वेबसाईट टाका.
- महसूल विभागाची वेबसाईट ओपन होणार आहे
- ई-रेकॉर्डस् पाहण्यासाठी e-Records या पर्यायावरकरा.
- महाराष्ट्र शासन महसूल विभाग’चे पेज ओपन होयील.
- उजवीकडील “भाषा’ पर्यायावर क्लिक करून भाषा निवड करा.
- डाव्या बाजूला चौकटी “लॉगइन’ व “मदत’ ऑप्शन येईल.
- वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून login करा.
- नोंदणी केलेली नसेल “नवीन वापरकर्ता नोंदणी’वर क्लिक करा.
- त्यानंतर वैयक्तिक माहिती भरा जसे की तुमचं नाव, मधलं नाव, आडनाव, लिंग
- राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर आदी माहिती भरा.
- व्यवसाय काय करता, मेल-आयडी, बर्थ डेट ही वैयक्तिक माहिती भरल्यानंतर सविस्तर पत्त्याविषयीचे रकाने भरा.
- लॉग इन आयडी तयार वेबसाईटच्या निर्देशानुसार लॉग इन आयडी तयार करा.
- निर्देशानुसार पासवर्ड टाका.
- जसेच्या तसे Captcha चौकटीत टाईप करा.
- सबमिट बटण दाबा.
- त्यानंतर स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा
- युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
जुने फेरफार, जुने सातबारा कसे काढावे ऑनलाईन
- आपला जिल्हा निवडा. पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार, फेरफार उतारा, सातबारा, आठ-अ असे पर्याय निवडा
- असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत
- गट क्रमांक टाका व “शोध’ या पर्यायावर क्लिक करा
- यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते
- फेरफाराचं वर्ष, क्रमांक दिलेला असतो. त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहा
- त्यानंतर पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तुमचं कार्ट ओपन होईल. त्याखाली असलेल्या “पुढे जा’ या पर्यायावर क्लिक केलं की “डाउनलोड सारांश’ पेज ओपन होईल
- फाइलची सद्य:स्थिती उपलब्ध आहे’ असे दिसेल
- फाईल पहा या पर्यायावर क्लिक केलं की तुमच्यासमोर 1982चं फेरफार पत्रक pdf ओपन होईल
how to get ferfar online maharashtra | online ferfar download | ferfar online download | mahabhulekh ferfar online | old satbara | 7/12 online maharashtra | june ferfar maharashtra | maha ferfar 7/12
📢 डिजिटल जुने व नवीन फेरफार काढण्यासाठी :- येथे पहा
📢 सौर उर्जा कुंपण 75% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा