Kharip Pik Vima 2021 Yadi | तक्रार दाखल केली विमा मिळाला नाही हे काम करा

Kharip Pik Vima 2021 Yadi : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. पिक विमा मिळाला नाही तर आता गावातच निघणार तोडगा राज्यातील विमा कंपनी शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. असली तरीही अजून तब्बल 84 हजार शेतकऱ्यांना तक्रार करून ही रक्कम खात्यात जमा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी सैरभैर झाला असून तक्रारी नोंदवण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात खेटे मारत आहेत. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना गावातच आता तक्रार नोंदवता येणार आहे. संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण हे जाणून घेणार आहोत. याची प्रक्रिया काय असेल पिक विमा आपल्याला कसा मिळेल याबाबत संपूर्ण माहिती पाहुयात.

पिक विमा कधी मिळणार 

आता शेतकऱ्यांना गावातच तक्रार तक्रार दाखल करता येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना तक्रार नोंदवता येणार हे तर राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु तक्रार नोंदवून तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा मिळेल का याचा प्रश्न हा कायम आहे. तर संपूर्ण माहिती पाहूयात कुठे आणि कसा अर्ज करायचा आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन ऑफलाइनच्या माध्यमातून नुकसानीची दावे करून देखील रक्कम खात्यावर जमा झाली नाही. अशा शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक कडे तक्रार करावी लागणार आहे. यामध्ये पिक विमा भरलेल्या पावतीचा क्रमांक, झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, पिक पेरा, या पिकासाठी विमा भरलेला आहे. या पिकाची नोंद असलेला पिक पेरा हा उल्लेख करून तक्रारी अर्ज करायचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालय किंवा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय यामध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

कशी मिळेल विमा भरपाई

त्याची प्रक्रिया कशी असेल तर थोडक्यात जाणून घेऊया शेतकऱ्यांना तक्रारीचे निवारण करण्यासाठी तालुका स्तरपासुन राज्यस्तरीय समिती नेमली जाते. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसीलदार साहेब असतात. आणि त्याचबरोबर जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. (Kharip Pik Vima 2021 Yadi) आणि यामध्ये कृषी अधिकारी, विमा प्रतिनिधी, दुय्यम निबंधक, शेतकरी प्रतिनिधी, यांचा समावेश असतो. तर शेतकर्‍यांच्या तक्रारी एकत्र करून त्यावर काय तोडगा निघू शकतो याचा अभ्यास या समिती करतात. यामध्ये चूक कोणाची आहे विमा भरताना नेमके काय झाले होते. त्यानुसार तालुका समिती निर्णय देते. आणि त्याच मध्ये शेतकरी किंवा विमा कंपनी ही जर असमाधानी असेल तर मग जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय समिती यामध्ये हस्तक्षेप करून यामध्ये निर्णय घेते.


📢 शेळी पालन अनुदान योजना :- येथे पहा 

📢 शेत जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा 

Leave a Comment