Kharip Pik Vima List | हेक्टरी 23 हजार रु. पिक विमा बँक खात्यात जमा

Kharip Pik Vima List | हेक्टरी 23 हजार रु. पिक विमा बँक खात्यात जमा

खरीप पीक विमा मंजूर 2021

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वच विमाधारक सोयाबीन उत्पादकांना पीकविमा परतावा मंजूर झाला आहे. विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकरी परताव्यापासून वंचित राहू नये, अशी ठाम भुमिका जिल्हा प्रशासनाने घेतली होती. यात बुडीत क्षेत्रातील ३२८ गावांना हेक्टरी किमान दहा हजार ते कमाल २३ हजार रुपये तर इतर एक हजार २९४ गावात प्रतिहेक्टर किमान सात हजार दोनशे ते कमाल दहा हजार आठशे रुपये परतावा मंजूर झाला आहे.

नांदेड खरीप पीक विमा 2021 

प्रधानमंत्री पिकविमा योजनेतंर्गत जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार शेतकऱ्यांना सहा पिकांसाठी ४६१ कोटींचा विमा परतावा मंजूर झाला आहे. हा परतावा सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. परंतु जिल्ह्यात सर्वाधीक सोयाबीन उत्पादकांना विमा कंपनीने हेक्टरी किती जोखीम रक्कम मंजूर केली, याबाबत सभ्रम होता. याबाबत विमा कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार विमा योजनेत सहभाग घेतलेल्या जिल्ह्यातील एकूण एक हजार ६२२ गावापैकी ३२८ गावातील पिकांना पुराचा फटका बसल्याचे कंपनीच्या सर्वेत दिसून आले आहे. तर इतर एक हजार २९४ गावातही सततच्या पावसामुळे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते.

पीक विमा हेक्टरी 23 हजार रु. खात्यात 

यामुळे विमा कंपनीकडून बुडीत क्षेत्रातील ३२८ गावातील सर्वच सोयाबीन विमाधारकांना हेक्टरी दहा हजार २२ ते २२ हजार ९५० रुपये जोखीम रक्कम मंजूर केली आहे. यात बुडीत क्षेत्रातील गाव हा घटक धरुन परतावा दिला आहे. (Kharip Pik Vima List) इतर एक हजार २९४ गावातील सर्वच सोयाबीन विमाधारकांना किमान सात हजार दोनशे ते कमाल दहा हजार आठ रुपये जोखीम मंजूर केली. सध्या अनेक शेतकऱ्यांना विमा परतावा खात्यावर जमा होत आहे. यात उडीद, मुग, ज्वारी, कपाशी, तूर यासह सोयाबीन या पिकांच्या परताव्याचा समावेश आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कमी रक्कम मिळाल्याची तक्रार केली आहे. परंतु हा परतावा सोयाबीन नाही तर इतर पिकांचा असू शकतो. सोयाबीनला हेक्टरी सात हजार दोनशे ते दहा हजार ८८१ रुपये मंजूर आहे. यातील ७३ टक्के रक्कमच खात्यावर येत असल्याची माहिती मिळाली.

पीक विमा यादी 2021 

तालुकानिहाय मिळालेला सोयाबीनच्या परताव्याची गावे (परतावा हेक्टरी)

तालुका…बुडीत क्षेत्र गावे….बुडीत क्षेत्र परतावा…इतर गावे…परतावा

अर्धापूर……….१८…………..२२९५०………..४६……….७२००

भोकर………..—-………….——-………..८२……….१०००८

बिलोली………१२…………..२०७९०…………८१……….८१००

देगलूर………..१९…………..२०२५०……….१०१……….७२००

धर्माबाद………२३…………..१८०००………..३४………..७२००

हि.नगर……….२४…………..१८०००………..४८………..७४५२

कंधार………..१७…………..१८०००………..११२……….७२९९

किनवट………६०…………..१००२२………..११७……….८५५०

लोहा…………२१…………..१६२००………..१०७……….८५५०

माहूर…………१५…………..१३५१८………..७४…………१०८८१

मुदखेड……….—…………..——………..५५…………१०००८

मुखेड………..१७…………..१९३५०……….१३२………..८१००

नायगाव………१७…………..१९८००………..७४…………८१००

नांदेड…………२७…………..१५३००………..७९…………७२००

उमरी…………२४…………..२०४०८………..४१………….७२००


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना अर्ज सुरू:- येथे पहा

सौजन्य :- esakal  ई-सकाळ

 

Leave a Comment