Kharip Pik Vima Yadi | याजिल्ह्याचा 360 कोटी रु विमा मंजूर आजपासून खात्यात जमा

Kharip Pik Vima Yadi : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम सन 2021-22 मधील

खरीप हंगामाचा पिक विमा मंजूर झाला आहे तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मंजूर झालेला आहे किती रुपये विमा या

ठिकाणी मंजूर झालेले संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

खरीप पिक विमा यादी 2021 

जिल्ह्यात २०२१ च्या खरीप हंगामात झालेल्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, त्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाईची

प्रतीक्षा होती. त्यांच्यासाठी आता विमा कंपनीने मोठी घोषणा केली आहे. विमा कंपनीने जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण

केले असून (Kharip Pik Vima Yadi) मंडळ निहाय पीका जाहीर केला आहे.

त्यानुसार आजपासून खरीप २०२१ च्या विम्याचे ३६० कोटी रूपये बीड जिल्ह्यातील ५ लाख ५९ हजार ५३२ शेतकऱ्यांच्या खात्यावर

येणार आहेत. दरम्यान खरीप २०२० च्या पीक विम्याचा पेच मात्र कायमच आहे. बीड जिल्ह्यासाठी खरीप पीक विमा घेतलेल्या

अग्रीकल्चरल इन्शुअरन्स कम्पनी ऑफ इंडियाचे व्यवस्थापक एस. व्ही. शेट्टी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून त्यात सॅम्पल

सर्व्हेच्या आधारे बीड जिल्ह्यात ३६० कोटींचा क्लेम निश्चित करण्यात आल्याचे म्हटले आहे.

खरीप पिक विमा लिस्ट 2021 

विमा कंपनीने मंडळ आणि पीक निहाय नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत

सॅम्पल सर्वे आधारित ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यानुसार आजपासून विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यावर येणार आहे.

ही मदत खरीपातील सर्वच पीकांसाठी असणार आहे. या मदतीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

आता २०२० च्या विम्यात इमानदारी हवी खरीप २०२१ च्या विम्याचे सर्व पैसे विमा कंपनीच्या हातात आहे, त्यामुळेच शेतकऱ्यांना पीक

विम्याची रक्कम तात्काळ मिळत आहे. २०२० च्या विम्याची रक्कम विमा कंपनीकडून राज्य सरकारच्या तिजोरीत गेलेली आहे,

त्यामुळेच ती शेतकऱ्यांना अद्यापही प्राप्त झालेली नाही, ज्याप्रमाणे विमा कंपनी शेतकऱ्यांसोबत ईमानदारी दाखविली अगदी त्याचप्रमाणे

आता राज्य सरकारनेही ईमानदारी दाखवून शेतकऱ्यांना खरीप २०२० च्या विम्याचे पैसे तात्काळ अदा करावेत.

Pik Vima List 2021

महिनाभरापासून सुरू होती मंजूरीची कारवाई बीड जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामात मोठठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, यामध्ये

शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले, याअनुषंगानेच सोयाबीन उत्पादक शेतक-यांना २५ टक्के ॲग्रीम मंजूर करण्यात आले

होते. यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिडशे कोटी प्राप्त झाले. त्या दिडशे कोटीनंतर आणखी ३६० कोटी रूपये आज दि. १०

डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत.


📢 गाय/म्हैस 75% अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन 75% अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment