Kharip Pikvima Yadi 2021 : नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. खरीप हंगाम सन 2021-22 अंतर्गत खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचबरोबर काही जिल्ह्यात विमा रक्कम जमा होत आहे. अशातच ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार विमा कंपनीला 72 तासाच्या आत केली होती. त्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2021-22 चा विमा मिळण्यास सुरू झाले आहे.
तर आता प्रश्न पडला असेल की ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रार विमा कंपनीस दाखल केली नाही. अशा शेतकऱ्यांना विमा मिळेल का मिळेल तर तो कसा मिळेल. त्याची संपूर्ण माहिती लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
Parbhani Pik Vima Yadi 2021
परभणी जिल्ह्यात चालू हंगाम 2021-22 हंगामात झालेल्या अतिवृष्टीत रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने पिक विमा मंजूर केला आहे. आणि ऑनलाईन मध्ये पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांपैकी 3 लाख 51 हजार 160 शेतकरी सध्या पीकवीमा घेण्यास पात्र ठरलेले आहेत. तर पूर्वसूचना न दिलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ हा एप्रिल-मे महिन्यात मिळणार असल्याची माहिती दिली आहे.
खरीप पिक विमा यादी 2021
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी पत्रकार परिषदेत माहिती देऊन शेतकऱ्यांना संयम ठेवण्याचे आव्हान केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदमध्ये जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी माहिती दिली आहे. (Kharip Pikvima Yadi 2021) सतत पाठपुरावा केल्यानंतर रिलायन्स कंपनीने परभणी जिल्ह्यात पिक विमा मंजूर केला आहे. आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. फक्त ऑनलाईन पूर्व सूचना दिलेल्या शेतकऱ्यांना आज मिळत आहे.
पिक विमा यादी 2021 परभणी
त्यांनी ऑनलाइन पूर्वसूचना दिली नाही त्यांना एप्रिल-मे मध्ये पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. तर काही शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम कमी मिळाले आहे. तर उर्वरित रक्कम ही एप्रिल-मे महिन्यात सर्वांसोबत मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही गडबड न करता वाट बघावी कायदा हातात घेऊ नये. अशी माहिती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी ही माहिती दिली आहे.
Kharip Pik Vima 2021
परभणी जिल्ह्यात एकूण 6 लाख 34 हजार 531 शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यापैकी पूर्वसूचना अर्थात तक्रार दाखल केलेले शेतकरी तीन लाख 51 हजार 160 इतकी आहे. या शेतकऱ्यांसाठी एकूण 272 कोटी रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 डिसेंबर 2021 पर्यंत 269 कोटी एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांना रक्कम वाटप करण्याचे काम देखील सुरू आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीस तक्रार दाखल केली नाही.
तक्रार न केलेल्या शेतकऱ्यांना विमा
तर त्या शेतकऱ्यांना एप्रिल ते मे महिन्यामध्ये विमा रक्कम नक्की मिळणार आहे. त्यावर शेतकऱ्यांनी कुठले ही अर्ज करण्या-साठी गर्दी करू नये. व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन देखील जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी दिले आहे. प्रशासन शेतकऱ्यांसोबत असल्याचा विश्वास व्यक्त करत ही माहिती दिली आहे. ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी. जसे काही इतर जिल्ह्याच्या पीकविमा अपडेट येथील आपल्याला कळविण्यात येईल.
📢 खरीप पिक विमा 6 जिल्ह्यांची यादी आली 2021 :- येथे पहा
📢 कुकुट पालन 1 ला ख 68 हजार अनुदान ऑनलाईन अर्ज सुरु :- येथे पहा