Land Survey Map Online :- शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. आता या 28 जिल्ह्यातील जमिनीचे नकाशे हे डिजिटायजेशन होणार आहे. अर्थातच अक्षांश आणि रेखांशानुसार आपल्या शेतजमिनीचा किंवा जमिनीचा नकाशा कसा दिसणार आहे.
हे आज या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत, हे डिजिटायझेशन नकाशे काय आहेत ?, हे देखील माहिती पाहूयात. आणि कोणते 28 जिल्हे आहेत महाराष्ट्रातील ज्यांना हे डिजिटायझेशन नकाशे मिळणार आहे.
Land Survey Map Online
आणि ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे, तर ही संपूर्ण माहिती पाहूया. लवकरच असे पारंपारिक पद्धतीचे राज्यातील सर्व प्रॉपर्टी कार्ड आणि सातबारा क्रमांकाचे नकाशा आता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
यामध्ये राज्यातील 28 जिल्ह्यातील भूमापन पद्धतीने जमिनीचे नकाशेचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. आणि त्याकरिता 16 डिसेंबर 2022 रोजी महसूल विभागाने सुकाणू समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
जमिनीचे नकाशे डिजिटायझेशन
सध्या सातबारा उतारे आणि प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन पद्धतीने मिळू शकतात. ऑक्टोबर 2015 मध्ये सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड बरोबर त्या जागेचा नकाशाही ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार नोव्हेंबर 2016 पासून आठ जिल्ह्यात पतदर्शी प्रकल्प राबविण्यात आला आहे. या यशस्वी प्रयोग नंतर राज्यातील उर्वरित 28 जिल्ह्यात तो राबवण्यात येणार आहे. मंगळूर येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स या सरकारी संस्थेत हे काम देण्यात आलेला आहे.
1885 पासूनचे शेतजमिनीचे 64 कागदपत्रे काढा ऑनलाईन
digitization of land records
याकरिता प्रत्येक जिल्ह्यात सुखानू समिती स्थापन केली जाणार राज्यात असलेल्या प्रत्येक जागेची सध्या ब्रिटिशकाली नकाशे उपलब्ध आहेत. राज्यात 1939 सन झालेल्या जमिनीच्या मोजणीनंतर सर्व नकाशा तयार करण्यात आले होते.
कागदावर असणारे हे नकाशा आता जीर्ण झाले असून त्याचे आयुष्य संपत आले आहे. आणि या डिजिटायझेशन केल्यामुळे सर्व रेकॉर्ड कायमस्वरूपी जतन करता येणार आहे. तर सदर डिजिटल नकाशे अक्षांश रेखांशानुसार तयार होणार आहेत.
त्यामुळे जगाच्या नकाशावरील तुमचे नेमकी जमीन कुठे आहे, ती कशी दिसते हे सहजपणे आपल्याला पाहता येणार आहे. याप्रकारे नकाशे कसे तयार केल्यामुळे जमिनीची हद्दी कायमस्वरूपी देखील स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा, पहा कसे पाहता येणार जमिनीचे नकाशे मोबाईलवर
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा