Sheli Gat Vatp Yojana | शेळी व 1000 मांसल कुकुट पालन 75% अनुदानासाठी कालावधी ठरला !

Sheli Gat Vatp Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये शेळी पालन करणाऱ्या व्यक्ती किंवा शेतकरी बांधवांसाठी 10 शेळ्या 1 बोकड किंवा 1000 कुकुट पक्षांच्या अनुदानासाठीचा महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

आणि या अंतर्गत लाभार्थ्यांना 75% टक्के अनुदानही देण्यात येते. तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये 1000 कुक्कुट पक्ष्यांचे अनुदानासाठी जो कालावधी आहे. हा निश्चित करण्यात आलेला आहे.  या बाबतचा जीआर आहे. तर या लेखांमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Sheli Gat Vatp Yojana

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण शेळी मेंढी गट वाटप. तसेच 1000 हजार मांसल कुकुट पक्षी संगोपणा द्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे. या योजनांमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना गट खरेदी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कालावधी निश्चित करण्याबाबत जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. दिनांक 24 जून 2022 चा शासन निर्णय हा कृषि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याकडून हा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 1000 मांसल कुकुट पक्षी संगोपनद्वारे कुकुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवणे. या योजनेअंतर्गत संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडून लाभार्थ्यांची निवड झाल्याबाबत पत्द्वारारे कळविण्याचे दिनांक पासून. तीन महिने कालावधीत 100% पायाभूत सुविधा उभारणे बंधनकारक राहील.

शेळी पालन अनुदान योजना 2022 

असे न केल्यास जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त यांनी संबंधितास 30 दिवसाच्या अंतिम मुदत द्यावी. आणि या कालावधी पायाभूत सुविधा उभारणी न केल्यास संबंधितांना या योजनेतून लाभ द्यायचा नाही. असं या जीआर मध्ये देण्यात आलेला आहे. असे गृहीत धरून प्रत्यक्ष यादी मधील पुढील लाभार्थ्यास लाभ देण्याचा कार्यवाही ही करावी, असे या जीआर मध्ये माहिती देण्यात आलेली आहे.

योजनेअंतर्गत सण 2021-22 पूर्वी मंजूर करण्यात आलेल्या या ज्या लाभार्थ्यांनी काही अपरिहार कारणास्तव अद्याप पायाभूत सुविधांची उभारणी केली नाही. अशा लाभार्थ्यांना अखर्च ी निधी शिल्लक असल्यास अशा प्रकरणी शेवटची संधी म्हणून 30 दिवसाच्या अंतिम मुदत द्यावी. आणि या कालावधी संबंधी त्याने पायाभूत केलेल्या संबंधितांना या योजनेचा लाभ द्यायचं नाही.

Sheli Gat Vatp Yojana

हेही वाचा; नवीन विहीर 3 लाख रु. अनुदान येथे पहा जीआर व भरा ऑनलाईन फॉर्म 

1000 मांसल कुकुट पालन योजना 

तसेच राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दहा शेळ्या/मेंढ्या किंवा एक बोकड किंवा नर मेंढा अशा या योजनेत. जिल्हा पशुसंवर्धन उपाय यांच्याकडून लाभार्थ्यांची निवड झाल्याबाबत पत्रद्वारे करण्यात या दिनांकापासून एक महिन्याचा कालावधी या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर जे 1000 मांसल कुकुट पक्षी योजना आहे, त्याला 3 महिने मुदत आहे. दहा शेळ्या एक बोकड या योजनेला सुद्धा तीस दिवसाची मुदत आहे.

संबंधितांनी लाभार्थी स्वहिस्सा रक्कम बँक कर्जदारी उभारलेली रक्कम संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या बँक खाते मध्ये जमा करावी. असे न केल्यास संबंधितना योजनेचा लाभ द्यावाच नाही. असे गृहीत धरून प्रतीक्षा यादी मधील पुढील लाभार्थ्यांस देण्याची कारवाई देखील करण्यात येणार आहे. हा शासन निर्णय आपल्याला हवा असल्यास खाली दिलेले माहिती वरून आपण जीआर पाहू शकतात.

Sheli Gat Vatp Yojana

येथे पहा योजनेचा शासन निर्णय 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 200 गाय पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment