Sheli Palan Navin Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये केंद्र शासनाची नवीन योजना 10 शेळ्या 1 बोकड योजना ही शासनाने 100% अनुदान वरती राबवण्यास मंजुरी दिलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 10 शेळ्या 1 बोकड करिता अनुदान देण्यात येणार आहे. यासाठीच पात्रता, कागदपत्रे, आणि तसेच योजनेचा शासन निर्णय या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर नक्की करा.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Sheli Palan Navin Yojana
10 शेळ्या 1 बोकड योजनेला मंजुरी मिळाली आहे. सदर योजना महिला बचत गटाकरिता आहे. ही योजना 10 शेळ्या 1 बोकड करिता असणार आहे. तर यासाठी 100% अनुदान देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय आपण खाली पाहू शकता. या योजनेची राबवणीची कार्यपद्धती कशी आहे. याबाबत सुद्धा माहिती त्या जीआर मध्ये देण्यात आलेली आहे. त्याकरिता जीआर ची लिंक खाली आपल्याला देण्यात आलेली आहे.
Goat Farming Scheme
विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत महिला बचत गटांना शेळी युनिट पुरवठा करणे. यासाठी केंद्र शासनाची 100% अनुदानावरती 10 शेळ्या 1 बोकड ही योजना सुरू केलेली आहे. त्यासाठी मंजुरी देखील मिळाली आहे, तर याबाबत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण जर अनुदान पाहिलं तर शेळ्या खरेदी करिता उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळ्या असतील.
500 शेळ्या 25 बोकड केंद्राची नवीन योजना पहा शासन निर्णय व करा ऑनलाईन अर्ज पहा माहिती
10 शेळ्या 1 बोकड अनुदान योजना
10 शेळ्यांकरिता ८० हजार रुपये म्हणजेच प्रति शेळी 10 हजार रुपये, असं या ठिकाणी अनुदान देण्यात येणार आहे. तसेच बोकड खरेदी करिता 1 बोकड उस्मानाबादी संगमनेरी असेल याकरिता 1 बोकड 10 हजार रुपये म्हणजे 1 बोकड करिता 10 हजार रुपये मिळणार आहे. असे 90 हजार रुपये हे 10 शेळ्या 1 बोकड करिता मिळणार आहे. तर शेळ्या आणि बोकडाचा विमा हा 3 वर्षासाठीचा यासाठी एकूण अनुदान जर आपण पाहिलं तर 1 लाख 3 हजार 545 रुपये एवढा अनुदान हे मिळणार आहे. तर एकूण 1 लाख 3 हजार 545 रुपये एवढा अनुदान हे मिळणार आहे.
या योजनेचा शासन निर्णय pdf पहाण्यासाठी व संपूर्ण माहिती करिता येथे क्लिक करा
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजने अतर्गत शेळी, मेंढी, कुकुट, गाई पालन साठी शासन देते अनुदान :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा