Shetila Tar Kumpan Yojana 2023 :- आजच्या या लेखा मध्ये आपण वन्य प्राण्यापासून शेती संरक्षणासाठी तार कुंपण ९०% अनुदान योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, या योजने मध्ये कोणाला अनुदान दिले जाणार व त्यासाठी कोण लाभार्थी पात्र असणार आहे.
- गावातील जन, जल, जंगल, जमीन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे.
- गावकऱ्यांची वनावरील निर्भरता कमी करणे. शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करणे.
- पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणे.
- मानव वन्यप्राणी संघर्ष कमी करणे.
- गावकऱ्यांच्या सहभागातून वन व वन्यजीवांचे संरक्षण करणे.
- व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे.
Shetila Tar Kumpan Yojana 2023
डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास व्याप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बफर शेत्रात तसेच अभयारण्य/राष्ट्रीय उद्याने यांच्या सिमेपासून अंतर ५ किलोमीटर संवेदनशील गावामध्ये शेत पिकाचे नुकसान टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावर लोखंडी जाळीचे कुंपण हे ९०% अनुदानावर राबविण्यात येणार आहे.
शेतीला लोखंडी तार कुंपण
लाभार्थी पात्रता:- व्याघ्र प्रकल्पाच्या बफर शेत्रात तसेच अभयारण्य/राष्ट्रीय उद्याने यांच्या सिमेपासून अंतर ५ किलोमीटर या मध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांची निवड केली जाईल. जसे अत्यल्प भूधारक अश्या प्रकारे प्राधान्य राहणार आहे
- योजनेचा शासन निर्णय :- येथे पहा
जिल्हा परिषद अनुदान योजना 2023
९० टक्के अनुदान या लाभार्थ्यांना अ.जा., अ.ज., वि.जा. अथवा, भ.ज. चे शेतकरी योजनेकरिता पात्र आहेत. संपूर्ण माहिती खाली पाहूयात 👇 शेतीच्या कुंपणा:- करीता 90 टक्के अनुदानावर काटेरीतार व खांब पुरविणे.
उद्देश :-पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता काटेरी तार लावण्याकरीता 90 टक्के अनुदानावर शेतक-यांना खांबाचे वाटप करण्यात येते. लाभार्थी निकष :- जिल्हयातील अ.जा., अ.ज., वि.जा. अथवा, भ.ज. चे शेतकरी योजनेकरिता पात्र आहेत.
शेतक-याना 75 टक्के अनुदानावर कुंपणासाठी तार व खांब पुरविणे.
- उद्देश :– पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता 75 टक्के अनुदानावर शेतक-यांना काटेरी तारेचे व खांबाचे वाटप करण्यात येते.
- लाभार्थी निकष :- जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत.
- लाभाचे स्वरूप :- प्रती लाभार्थी साधरणतः 200 किलो काटेरी तार व 30 नग खांब 75 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 25 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते.
- अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
- अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ)