Soybean Milipid Niyantran :- नमस्कार सर्वांना. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. सोयाबीन पिकावर गोगलगाय नंतर आता मिलिपिड या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. आणि शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक हे 2 दिवसाच्या आत पूर्ण सोयाबीन पीक हे साफ करत आहे.
तर हे मिलिपिड काय आहेत ?, यावरती नियोजन काय करायचे आहे ?, याच्या उपाययोजना काय असतील ?. जेणेकरून आपण मिलिपिड रोखू शकतो. होणार पादुर्भाव त्याचा रोखू शकतो. आणि त्याचबरोबर मिलीपिड नेमके काय आहेत ?, याबाबत संपूर्ण माहिती.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Soybean Milipid Niyantran
अति पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात असतानाच गोगलगाय याचा सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात संकट ओढवले आहे. आणि त्याच्यानंतर मिलिपिड या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. हे कीटक कोवळ्या सोयाबीन पीक पूर्णतः फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा एकदा मोठे आव्हान उभे राहिले आहे. तर यावरती नियोजन काय आहे ?, जाणून घेऊया.
सोयाबीन पिकांचे कीड नियंत्रण
सोयाबीन पीक नुकताच बहरत असतानाच मिलीपिड (वाणी) त्याला आपण मराठीमध्ये किंवा आपल्या शेतकरी भाषेमध्ये त्याला वाणी याने ओळखतो. तर या किडीचा प्रादुर्भाव त्यावर झाल्याने दिसून येत आहे. ज्वारी वरील ही मुख्य कीड आहे. तर अलीकडील अन्य खरीप पिकावरील तिने आता मोर्चा वळवला आहे.
आणि सोयाबीनची कोवळी रोपे वाणी किडीने कुतरड्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी दुबार पेरण्याचे संकटे शेतकऱ्यांवर आहे. तर सोयाबीन पीक वाढीच्या टप्प्यात असताना यावर मिलिपिडचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या आठवड्याभरात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे कोवळी पीक या किडीने फस्त केली आहे.
मिलीपिड (वाणी) पादुर्भाव उपयोजना
सर्वात प्रथम जाणून घेऊया मिलीपिड (वाणी) हा काय आहे. तर मिलिपिड किडीला स्थानिक भाषेमध्ये शेतकरी भाषेत वाणी या नावाने ओळखले जाते. तर पावसाने उघडीप दिल्याच्या काळात जमिनीतील भेगातून हे कीड बाहेर पडते. आणि उगवलेली पीक खाते सीआयबीकडून या किडीच्या नियंत्रणासाठी कोणत्याच कीटकनाशकाची शिफारस करण्यात आलेली नाहीये.
त्यामुळे मिलिपिड (वाणी) चे समूह ही केरोसीनच्या (रॉकेल) त्याला आपण म्हणतो, त्या पाण्यात बुडून नष्ट करावे, हा यावरती एकमेव उपाय आहे. किंवा सध्या तरी सीआयबीकडून यासाठी कीटकनाशकांची शिफारस करण्यात आलेली नाहीये. तर यामध्ये केरोसिन (रॉकेल) ला पाण्यात बुडवून हे आपल्याला नष्ट करावे लागणार आहे.
मिलिपिड (वाणी) फवारणी कोणती करावी ?
१ पीक लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी हलकी वखरणी, पीक ३० ते ३५ दिवसांपर्यंत दोन ते तीन कोळपणी. बांधावरील गवत नष्ट करून बांध नेहमी स्वच्छ ठेवणे. समूहात आढळणारी कीड फावड्याच्या साह्याने किंवा हातात हातमोजे घालून वेचून नष्ट करणे. खाडे भरताना बियाण्या बरोबर दाणेदार कीडनाशकांचा वापर करणे. कीड संपूर्ण शेतात पसरलेली असल्यास क्लोरपायरिफॉस (२० ईसी) ३ मिली किंवा क्लोरपायरिफॉस (५०%) अधिक सायपरमेथ्रीन (५% ईसी) (संयुक्त कीडनाशक) १.५ मिलि प्रति लिटरप्रमाणे फवारणी करावी.
हेही वाचा; महाबीज सोयाबीन बियान दर जाहीर येथे पहा
सोयाबीन पिक वाणी नियंत्रण
थायामेथॉक्स १२.६ अधिक लॅम्बडासीहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी कीटकनाशक ४ मिली. प्रती लिटर पाण्यात फवारणे, रोपांच्या मुळाजवळ पंपाचे नोझल काढून ‘ड्रेचिंग’ ३ केल्यास बुध्यालगत मातीत असलेल्या किडीच प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. कार्बोसल्फान (१० टक्के दाणेदार), क्लोरपायरिफॉस (१० टक्के दाणेदार) किंवा फिप्रोनील (०.३ टक्के) ५ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून ओळीने रोपांजवळ वापरावे.
सोयाबीन पिकावरील गोगलगाय वरील नियंत्रण येथे पहा
📢 फळबाग लागवड 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 शेतकरी योजना महाराष्ट्र 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा