Soybean Tokan Yantra :- नमस्कार सर्वांना. जिल्हा परिषद सेस फंडातून सोयाबीन टोकण यंत्रासाठी 50% अनुदान देण्यात येणार आहे. तर कोणत्या जिल्हा परिषद साठी ही अर्ज सुरू आहेत.
याबाबत माहिती जाणून घेऊया. तर सोयाबीन टोकन यंत्र यासाठी सेस फंडातून ही योजना राबवली जात आहे. तर लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते.
Soybean Tokan Yantra
जिल्हा परिषद लातूरचे खंडातून सोयाबीन टोकन यंत्र 50 टक्के अनुदानावर डीबीटी तत्त्वावर या ठिकाणी देण्यात येणार आहे. सदर योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या महिलांना प्राधान्य राहणार आहे.
इच्छुक शेतकऱ्यांनी स्वतःचा सातबारा, आठ अ उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स लाभार्थी अनुसूचित जाती जमातीचा असल्यास त्यातला जातीचे प्रमाणपत्र.
सोयाबीन टोकन यंत्र योजना
अपंग लाभार्थ्यांसाठी अपंगाचा दाखल्याचा झेरॉक्स प्रत आपल्याला पंचायत समितीकडे अर्ज सादर करायचे आहेत. लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी एका महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून आपल्याला पसंतीच्या अवजाराची खरेदी करायची आहे.
जिल्हा परिषद सेस फंड
सदर खरेदी करावयाच्या अवजारे अधिकृत सक्षम पसंतीचे अवजारेची खरेदी करावी लागेल. सदर खरेदी करावयाची. अवजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परीक्षण करून ती बी आय एस. अथवा अन्य संस्थांनी निश्चित केलेल्या क्रमांका नुसार तांत्रिक निकषनुसार असावे लागणार आहे.
सोयाबीन टोकन यंत्र महाराष्ट्र
सदर अवजारासाठी जास्तीत जास्त अर्ज झाल्यास लक्षात करून सर सोडत पद्धतीने. लाभार्थ्यांची निवड या ठिकाणी पंचायत समिती स्तरावर करण्यात येणार आहे.
मंजूर अवजारे अनुदान संबंधित पंचायत समिती स्तरावर करण्यात येईल. आणि मंजूर अवजाराच्या अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँका त्यावरती डीबीटी प्रणाली द्वारे अधिकार देण्यात येणार आहे.
सोयाबीन टोकन यंत्र योजना
शेतकऱ्यांनी 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत आपल्या पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्र सह अर्ज करावे. असे अवाहन कृषी विकास अधिकारी व माननीय मुख्य अधिकारी जिल्हा परिषद लातूर
यांनी यावेळेस केलेले आहे. आणि याचबरोबर आपण महाडीबीटी पोर्टलवर सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. जे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी असणार आहे.
त्यासाठी आपल्याला खाली देण्यात आलेली माहिती सुद्धा पाहू शकता. महाडीबीटी वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसे करायचे. त्या संदर्भात माहिती खाली दिलेली आहे.
येथे पहा mahadbt योजना व माहिती
📢 नवीन सिंचन विहीर करिता 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा