Top 5 Soybean Seeds in Maharashtra :- नमस्कार सर्वाना. आपल्याला माहिती असेल की सोयाबीन हे पीक देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
परंतु शेतकरी बांधवाना योग्य माहिती किंवा माहिती असून सुद्धा बियाणे मिळत नाही. तर आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत की देशातील (भारतातील) सोयाबीन टॉप 5 बियाणे विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Top 5 Soybean Seeds in Maharashtra
यंदाचे सोयाबीनचे टॉप 5 बियाणे :- तर हे सोयाबीन चे कोणते टॉप 5 वाण आहेत, जे शेतकरी बांधव सोयाबीन लागवड करून मोठ्या प्रमाणात उत्त्पन्न वाढू शकता. रोग, कीटक, पावसापासून सुद्धा मोठ्या प्रमाणात टिकाऊ म्हणजे चांगली आहे.
हे जाणून घेऊयात. तर हा लेख संपूर्ण वाचायचा आहे. व आपल्या मित्र,शेतकरी बांधव यांना शेअर नक्की करा चला तर मग जाणून घेऊया, सोयाबीनचे टॉप 5 बियाणे कोणते ?.
भारतातील टॉप 5 सोयाबीन बियाणे ?
JS-2034 सोयाबीन बियाणे :- या वाणाची लागवड शेतकरी बांधव 15 जून ते जून अखेर पर्यंत पेरणी करू शकता. JS-2034 या सोयाबीन वाणाची धान्याचा रंग हा पिवळा असतो, तर फुलांचा रंग पांढरा आणि शेंगा पांढरा असते.
या वाणाची खास वैशिष्ट्य म्हणजे हे सोयाबीन बियाणे कमी पाण्यात सुद्धा चांगलं उत्पादन देते. JS-2034 हे वाण सुमारे एक हेक्टर मध्ये 24-25 क्विंटल उत्पादन देते. हे पीक 80-85 दिवसांत काढले जाते. JS-2034 हे सोयाबीन लागवडी करिता 30 ते 35 किलो बियाणे लागते.
फुले संगम KDS-726 सोयाबीन वाण
फुले संगम 726 :- हे बियाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्र ने 2016 साली शिफारस केलेले वाण आहे. इतर वाणा पेक्षा याची मजबुती जास्त आहे, फुले संगम 726 या बियाणे चे एक शेंगा मध्ये 3 दाणे असतात.
त्याला 350 शेंगा असतात, त्याचे दाणे जाड असते, त्यामुळे उत्पादनात डबल फायदा होतो. या जातीची लागवड मुख्यतः महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात होते. या जातीचे तांबेरा रोगास कमी संवेदनाक्षम म्हणून शिफारस केली जाते.
पानावरील डाग आणि खवलेला तुलनेने प्रतिरोधक आहे. जात पाने, खाणाऱ्या आळ्याना काही प्रमाणात सहनशील आहे. तांबेरा रोगास माफक प्रमाणत प्रतिरोधक आहे.
हेही वाचा; अद्रक लागवड कशी करावी व संपूर्ण व्यवस्थापन
Soyabean Seed KDS-726
या जातीचा परिपक्वतेचा कालावधी 100 ते 105 दिवसांचा आहे. फुले संगम 726 या जातीचे उत्पादन 35-45 हेक्टरी मिळते. Soyabean KDS-726 हे सोयाबीन वाण उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून हेक्टरी 40 क्विंटल उत्पादन पाहायला मिळाले आहे. फुले संगम 726 या जातीचे तेलाचे प्रमाण 18:42% असते.
MACS 1407 सोयाबीन वाण
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था MACS-Agrahar Research Institute (ARI), पुणे. येथील शास्त्रज्ञांनी ही जात विकसित केली आहे. यासह भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), नवी दिल्ली यांनी सहकार्य केले आहे.
ही सोयाबीनची नवीन विकसित केलेली जात आहे, जी झारखंड, छत्तीसगड, आसाम, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये लागवडीसाठी योग्य आहे.
या जातीचे बियाणे पुढील वर्षी 2022 च्या खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाईल. सोयाबीनची ही जात अधिक उत्पादन देणारी, तसेच रोगास प्रतिरोधक आहे, त्यामुळे ती भारताची उत्पादन क्षमता वाढवू शकते.
सोयाबीन 6124 वाण संपूर्ण माहिती
पेरणीसाठी 15 जून ते 30 जून ही योग्य वेळ आहे. पेरणीसाठी एकरी 35-40 किलो बियाणे पुरेसे आहे. सोयाबीन VS 6124 वाण सुमारे एक हेक्टरमध्ये 20-25 क्विंटलपर्यंत उत्पादन देते. ९०-९५ दिवसांत पिके काढणीस तयार होतात. फुलांचा रंग जांभळा असून पाने लांबट असतात.
आणि या उत्पन्नाबाबत आपण जर पाहिलं तर या जातीपासून हेक्टरी मध्ये 20 ते 25 क्विंटल उत्पादन आपल्याला मिळू शकतं. आणि या जातीमुळे सोयाबीनचे पीक 90 ते 95 दिवसात तयार होते. त्यांनी या जाती फुलांचा रंग जांभळा आणि पाने लांब असतात.
हेही वाचा; कापूस टॉप 5 वाण जाणून घ्या संपूर्ण व्यवस्थापन व उत्पन्न माहिती
प्रताप सोया 45 सोयाबीन वाण
प्रताप सोया 45 (RKS-45) :- हे सोयाबीन वाण 30 ते 35 क्विंटल हेक्टरी उत्पन्न देते. तरी या जातीच्या सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण 21 टक्के आणि प्रथिनांचे प्रमाण 40 ते 45 टक्के आहे. सोयाबीनची जात चांगली आहे आणि फुले पांढरी असतात.
आणि या बिया पिवळ्या रंगाच्या आणि तपकिरी रंगाच्या या बियाणे असतात. ही जात 90 ते 98 दिवसात परिपक्व होते. ही जात काही प्रमाणात पाणी टंचाई सहन करू शकते, दुसरीकडे बागायती भागात खतांना चांगला प्रतिसाद देते. ही जात ऍलो मोझॅक व्हायरसला काही प्रमाणात प्रतिरोधक आहे.
हेही वाचा; सोयाबीन बियाणे चे सुधारित 10 बियाणे जाणून घ्या संपूर्ण व्यवस्थापन याविषयी माहिती येथे पहा
📢 नवीन सोलर पंप करिता 100% अनुदान फक्त या शेतकऱ्यांना :- येथे करा ऑनलाईन अर्ज
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे भरा फॉर्म लगेच