Gai mhais anudan yojana 2021 | kukut palan anudan yojana 2021

Gai mhais anudan yojana 2021 | kukut palan anudan yojana 2021

जिल्हा परिषद अनुदान योजना 2021-22 अंतर्गत 10 शेळ्या 1 बोकड व 2 गाय किंवा 2 म्हशी आणि कुक्कुटपालन (पक्षांचा पिल्लांचा गट) दुभत्या जनावरांना खाद्य अनुदान योजना सुरु झाली आहे. योजना कोणत्या जिल्ह्यात तसेच योजनेची पात्रता कागदपत्रे त्याचबरोबर किती अनुदान कुकुटपालन, शेळी पालन, गाय/म्हैस पालन साठी देण्यात येणार आहे संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

एकात्मिक कुक्कुटपालन योजना 2021

कुक्कुटपालन योजना:- 
एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत 50% टक्के अनुदानावर एक दिवसीय सुधारित पक्षांचा 100 पिल्लांचा गट वाटप करण्यासाठी सन 2021-22 या वर्षासाठी एकूण 131 गट यांचे उद्दिष्ट असून प्रकल्प किंमत रुपये 16 हजार रु.आहे 50% टक्के शासकीय अनुदान म्हणजेच रुपये 8 हजार रुपये अनुदान देय राहील. यामध्ये रुपये 2 हजार रुपयेची पिल्ले व 6 हजार खाद्य याचा समावेश आहे उर्वरित 50% टक्के लाभार्थी हिस्सा रुपये 8 हजार मधून लाभार्थींनी पक्ष्यांचा निवारा खाद्याची भांडी पाण्याची भांडी औषधी यावर खर्च करायचा आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी निवड पात्रता

दारिद्र रेषेखालील भूमिहीन शेतमजूर (तलाठी यांचे भूमी असल्याचे प्रमाणपत्र) मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती अत्यल्प व अल्पभूधारक या प्राधान्य क्रमांकानुसार राहील महिलांना 30% टक्के व दिव्यांगासाठी 5% टक्के आरक्षण राहील

अर्ज सादर कुठे करावा ?

योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा (जवळील पशुवैद्यकीय दवाखाना)

कुक्कुटपालन योजना 2021-22 फॉर्म

कुक्कुटपालन योजना 21 22 साठी चा फॉर्म:- येथे क्लीक करा

शेळ्यांची गट वाटप योजना 2021-22

10 शेळ्या आणि 1 बोकड योजना सन 2021-22 वर्षासाठी एकूण 18 शेळी गटाचे उद्दिष्ट असून उस्मानाबाद जिल्ह्यात सदर योजनेंतर्गत एकूण प्रकल्प किंमत रुपये 71,239/- असून 75% टक्के अनुदान रु. 53,429 अनुदान देय राहील.

10 शेळ्या 1 बोकड योजना 2021:-
शेळ्यांचा विमा शेळी गट यांचा 3 वर्षाचा विम्याचा समावेश आहे, शेळी खरेदी कुठून करावी ?
यामध्ये शेळी गटाचा खरेदी प्राधान्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्या कडून करण्यात येणार आहे.

योजनेचा अनुदान :- 10 शेळ्या 1 बोकड योजना 2021-22 अंतर्गत अनुदान 75% टक्के अनुदान रु. 53,429/- एवढे अनुदान देय राहील

योजनेचे लाभार्थी पात्रता

दारिद्र्य रेषेखालील अत्य भूधारक, अल्पभूधारक बचत गटातील लाभार्थी अनुक्रमणिका 1 ते 4 मधील या प्राध्यान्य क्रमांकानुसार राहील सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात चालू नोंद असलेले) महिलांना 30% टक्के दिव्यांगासाठी 5% टक्के आरक्षण असणार आहे
लाभार्थी निवड प्रकिया
लाभार्थी निवड समिती शेळी गट खरेदी समिती शासनाने निश्चित केलेली आहे त्या प्रमाणे खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल
अर्ज सादर कुठे करावा ?
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज जवळील पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावयाचा आहे

10 शेळ्या 1 बोकड योजना फॉर्म

10 शेळ्या 1 बोकड अनुदान योजनेचा अर्ज:- येथे डाउनलोड करा

गाय/म्हैस अनुदान योजना सन 2021-22

जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत 2 दुधाळ जनावरांचा गट वाटप योजना 2021-22 (Gai mhais anudan yojana) 2021 उस्मानाबाद जिल्ह्यात सन 2021-22 या वर्षासाठी एकूण 15 गटांचा उद्दिष्ट असून प्रकल्प किंमत रुपये 85 हजार 61 रुपये असून 75% टक्के अनुदान म्हणजेच रुपये 63 हजार 796 रुपये अनुदान देय राहील
गाय/म्हैस अनुदान योजना 2021-22
अनुदान :- 75% टक्के 63,796 अनुदान देय राहील.
गाय/म्हैस विमा 2021-22:- गाय म्हैस अनुदान योजनेअंतर्गत 3 वर्षाचा विमा यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे

योजनेचे लाभार्थी पात्रता:- दारिद्र रेषेखालील अत्यल्प भूधारक अल्पभूधारक सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात चालू नोंद असलेले) महिला बचत गटातील लाभार्थी 1 ते 4 मधील या प्राधान्यक्रमानुसार राहील महिलांना 30% टक्के व दिव्यांगासाठी 5%  टक्के आरक्षण राहील लाभार्थी निवड गाय गट खरेदी समिती शासनाने निश्चित केली आहे.

लाभार्थी निवड प्रकिया
लाभार्थी निवड प्रक्रिया ही लाभार्थी निवड समिती व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत होईल                                        योजनेचा अर्ज सादर कुठे करावा ?
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावयाचा आहे

गाय/म्हैस अनुदान योजना फॉर्म ?

योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी:- येथे क्लिक करा

सदर योजना:- सध्या फक्त उस्मानाबाद जिल्हा करिता सुरु आहे.  


सदर योजनाची संपूर्ण माहिती हा video पहा 

कुसुम सोलर पम्प योजना ९५% टक्के अनुदानावर सुरु:- येथे पहा 

Leave a Comment