Krushi Yantrikikaran Yojana | ट्रक्टर,रोटावेटर, पेरणी यंत्र अनुदान online फॉर्म सुरु

Krushi Yantrikikaran Yojana : नमस्कार सर्वांना आजच्या या लेखामध्ये शेतकरी बांधवानो अतिशय आनंदाची बातमी आहे. महाडीबीटी पोर्टल वर शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा 2022 करिता शेती योजना या सुरू झालेल्या आहेत. या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत आपण या लेखांमध्ये ट्रॅक्टर अनुदानसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा.

त्याचबरोबर रोटावेटर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा. त्यानंतर पेरणी यंत्र असेल यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा. याबाबत ची संपूर्ण माहिती जसे कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. कोणते लाभार्थी या योजनेचा अर्ज करू शकतात याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Tractor anudan Yojana 2022

सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर 2 डब्ल्यू डी मध्ये 8 एचपी ते 20 एचपी. यामध्ये असलेल्यास ट्रॅक्टर 50 टक्के अनुदान तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जाती लाभार्थ्यांसाठी एक लाख रुपये पर्यंत जास्तीत जास्त अनुदान दिले जाणार आहे. आणि इतर लाभार्थ्यांसाठी 75 टक्के 75 हजार रु. अनुदान देय असणार आहे. तसेच 2 डब्ल्यू डी मध्ये 20 पेक्षा जास्त ते 40 एचपी एससी, एसटी कॅटेगिरी, साठी एक लाख पंचवीस हजार रुपये जास्तीत जास्त अनुदान. सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी एक लाख रुपये पर्यंत अनुदान दिले आहे. तसेच 40 एचपी पेक्षा ते 70 एचपी पर्यंत असल्यास एससी, एसटी कॅटेगिरीतील एक लाख 25 हजार रुपये अनुदान जास्तीत जास्त असणार आहे.  सर्वसाधारण साठी एक लाख रुपये अनुदान दिले जाते. यामध्ये 4wd  आणि 2wd यामध्ये एकच सारखं अनुदन आहे. त्यामुळे आपण एकच माहिती पाहिली.

Rotavator Anudan Yojana 

रोटावेटरसाठी एससी, एसटी, कॅटेगिरी लाभार्थ्यांसाठी एकूण अनुदान 40 हजार रुपये यापेक्षा जास्त अनुदान देय नाही. त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांसाठी (Krushi Yantrikikaran Yojana) 32 हजार रुपये जास्तीत जास्त अनुदान दिले जाणार आहे. याची अनुदान टक्केवारी पाहिली तर SC, ST साठी 50 टक्के आणि इतर कॅटेगिरी साठी 40 टक्के अनुदान देय आहे. परंतु लिमिट ही 40 हजार रुपये ते बत्तीस हजार पेक्षा जास्त नसणार आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना :- अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांना किती व कोणत्या कॅटेगिरी साठी किती अनुदान संपूर्ण माहिती पाहण्यासाठी लिंक :- येथे पहा 

Perani Yantra Maharashtra 2022

पेरणी यंत्र अंतर्गत स्ट्रीप टिल ड्रिल (5 फण) SC, ST कॅटेगिरीतील लाभार्थ्यांसाठी 30 हजार रुपये जास्तीत जास्त अनुदान आणि इतर लाभार्थ्यांसाठी 24 हजार रुपये जास्तीत जास्त अनुदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर पेरणी यंत्र बियाणे खत पेरणी यंत्र पाच फणसाठी एकूण अनुदान SC, ST कॅटेगिरीसाठी पंधरा हजार रुपये. त्यानंतर इतर लाभार्थ्यांसाठी 12 हजार रुपये अनुदान जास्तीत जास्त असणार आहे. सदर योजना ट्रॅक्टर रोटावेटर आणि पेरणी यंत्र बद्दल संपूर्ण माहिती अटी, शर्ती आणि पात्रता, कागदपत्रे संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबत माहिती आपण दिलेले आहे तो व्हिडीओ आपण पाहू शकता.


📢 केंद्र सरकार 500 शेळ्या 25 बोकड योजना :- येथे पहा 

📢 शेत जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा 

 

Leave a Comment