Krushi Karj Mitra Yojana Form : नमस्कार सर्वांना राज्यातील बेरोजगारांना सरकारने सुवर्णसंधी आली आहे. बेरोजगारांना आपल्या गावात राहूनच रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाने कृषी कर्ज मित्र योजना सुरु केली आहे. तरी ही योजना नेमकी काय आहेत ?. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ? शेतकऱ्यांना या कृषी कर्ज मित्रांचा कसा लाभ मिळणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती व कृषी कर्ज मित्र योजना ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत. ही संपूर्ण माहिती व त्यांना मानधन कसे दिले जाणार आहे, त्यासाठी कागदपत्रे, शिक्षण, पात्रता, काय लागणार आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
कृषी कर्ज मित्र योजना 2022
शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी कर्ज मित्र योजना. राबविण्याबाबत ग्राम विकास विभाग यांच्याकडून 21 ऑक्टोबर 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. आणि या योजनेला राज्यात राबवण्याबाबत मंजुरी देण्यात आली. तर या कृषी कर्ज योजनेचा शेतकऱ्यांना कर्जासाठी तसेच कृषी कर्ज मित्रांना रोजगार कसा उपलब्ध होणार आहे ही संपूर्ण माहिती पाहुयात.
शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खासगी बँका मार्फत मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून (Krushi Karj Mitra Yojana Form) कृषी कर्ज माफी योजना राबवण्याची मान्यता. 21 सप्टेंबर 2021 रोजी मान्यता देण्यात आली आहे.
कृषी कर्ज मित्र योजनेचा ऑनलाईन कसा करावा
अर्ज हे सध्या औरंगाबाद जिल्हा परिषद संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे. आपण औरंगाबाद जिल्ह्यातील लाभार्थी फॉर्आम भरू शकता. तसेच योजनेचा फॉर्म कसा भरावा, औरंगाबाद जिल्हा परिषदची ऑफिशिअल वेबसाईट लिंक आपल्याला पुढे देण्यात आलेली आहे. ↪ येथे पहा ↩ त्या वरती जाऊन आपण ऑनलाईन नोंदणी करू शकता. आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी कर्ज मित्र योजनेचे ऑनलाइन फॉर्म सुरु झाले आहेत का ? हे पाहण्यासाठी आपल्याला प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषदचे ऑफिशिअल वेबसाईट आहे या वरती जाऊन चेक करावं लागणार आहे.
👉👉केंद्र सरकारची 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 ऑनलाइन फॉर्म सुरु येथे पहा👈👈
कृषी कर्ज मित्र योजनेचे स्वरुप
दरवर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकरी पीक कर्ज घेत असतात. आणि या लागवडीखालील क्षेत्र व एकूण पीक कर्जवाटप पाहिले असता यात विषमता आढळून येते. तर कृषिक्षेत्रात भांडवलाचा व गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या विकासात अधिकची भर पडणे आवश्यक आहे. यासाठी कृषी मित्र योजना ही सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे, परंतु कर्ज प्रक्रियेच्या ज्ञान नसल्यामुळे कर्ज मिळणे शक्य होत नाही. अशा सर्व इच्छुक पात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहजसुलभतेने उपलब्ध होण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांची मदत सहाय्यक देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी कर्ज मित्र यांच्या मदतीने गरजू पात्र शेतकऱ्यांची ज्या बाबीसाठी कर्ज आवश्यक आहे अशी प्रकरणे कृषी कर्ज मित्र यांच्या साह्याने तयार केल्यास शेतकऱ्याला वेळत कर्ज उपलब्ध होणार आहे.
👉👉सदरील वरील योजनेचा शासन निर्णय येथे पहा👈👈
📢 50 पेक्षा जास्त शेतकरी अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 पीएम किसान योजनेची ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर :- येथे पहा