Farmer Light Bill Discount Scheme :- Government Scheme: गेल्या बरेच दिवसापासून महावितरण कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा वादविवाद सुरू होता.
या मगच मुख्य कारण म्हणजे महावितरण कंपनीकडे ज्या प्रमाणात ग्राहक आहेत, त्याच प्रमाणात थकबाकीसुद्धा तितकीच आहे.
महावितरणवर थकबाकीचा बोजा झाल्यामुळे या सर्व गोष्टी समोर येत होत्या. विशेषता यामध्ये पुणे प्रादेशिक विभागातील (Mahavitaran) कृषीपंप वीज ग्राहक शेतकऱ्यांची थकबाकी जास्त वाढली होती.
Farmer Light Bill Discount Scheme
वसुली करण्यासाठी महावितरणमार्फत अनेक नवीन योजना शेतकऱ्यांसमोर ठेवण्यात आल्या. यामध्ये महावितरण कंपनीची थकबाकी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने
नवीन कृषीपंप धोरणसुद्धा 2020 ला तयार केलेले आहे. त्या धोरणाला अनुसरून 31 मार्च 2023 पर्यंत थकबाकी भरणाऱ्या कृषीपंप शेतकरी ग्राहकांना 30 टक्के सूट देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी ही एक चांगली संधी असून फक्त यामध्ये 30% सूट दिली जात नाही, तर विलंब आकार व व्याजसुद्धा (Interest Waive off) माफ करण्यात येत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आता तरी थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे प्रादेशिक विभागाच्या संचालकमार्फत माहिती देण्यात आली.
महावितरणवर 12 हजार कोटी थकबाकी
मागील वर्षाच्या सरतीशेवटी म्हणजेच डिसेंबर 2022 अखेरपर्यंत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात कृषीपंप (agriculture pump) विज ग्राहकांची एकूण थकबाकी जवळपास 12 हजार 61 कोटी इतकी होती.
ही थकबाकी कमी करण्याच्या हेतूने महावितरणमार्फत जानेवारी 2021 ते मार्च 2022 पर्यंत वीज बिलामध्ये 50% टक्के सूट देण्यात आली होती.
बिल भरण्याची मुदत किती ?
शेतकऱ्यांना एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्येच आपला थकित बिलाचा वीज भरणा करून घ्यायचा आहे. या कालावधीमध्ये भरणा करण्यात आलेल्या ग्राहकांनाच वीज बिलामध्ये 30 टक्के सूट देण्यात येणार आहे.
तसेच विलंब आकार व व्याज पूर्णता: माफ करण्यात येईल. महावितरणच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नक्कीच काही प्रमाणात विजबिलामध्ये सवलत मिळेल.
येथे पहा वीज बिल तुमचे माप होणार का चेक करा ऑनलाईन
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 नवीन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा