Gharkul D Yadi 2022 Maharashtra :- नमस्कार सर्वांना. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्याकडून घरकुल योजना संदर्भात महत्त्वाचं परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. तर घरकुल ड संदर्भात हे परिपत्रक आहे. तर घरकुल ड अंतर्गत ज्या लाभार्थ्यांचं यादीमध्ये नाव आलं होतं. परंतु घरकुल मिळालं नाही ?, किंवा नवीन नोंदणी करायचे आहे. तर या संदर्भातील हे परिपत्रक आहे. आपल्याला हा संपूर्ण लेख वाचायचा आहे. जेणेकरून या संदर्भातील संपूर्ण परिपत्रक व यामध्ये देण्यात आलेली माहिती आपल्याला समजून येईल. लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर नक्की करा.
Gharkul D Yadi 2022 Maharashtra
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांचे कार्यालय येथून परिपत्रक दिनांक 3/8/2022 रोजी जारी करण्यात आलेला आहे. या परिपत्रकाचा विषय आहे, इतर संवर्गातील पात्र कुटुंबाची माहिती पाठवण्याबाबतच हे परिपत्रक आहे. तर काय आहे परिपत्रक संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आपण जाणून घेणार आहोत.
घरकुल ड योजना परिपत्रक
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार. यांच्या सूचनेनुसार जे कुटुंब सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण (SECC2011) मध्ये व प्राधान्य क्रमांक यादी जीपीएल मध्ये समाविष्ट नव्हते. अशा पात्र कुटुंबासाठी सप्टेंबर 2018 मार्च, 2019 मध्ये आवास प्लस (प्रपत्र ड) सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये राज्यात 57,60,056 कुटुंबाची अवस्था मार्फत नोंदणी करण्यात आली त्यापैकी 10,84,575 कुंटुबे System द्वारे आपात्र ठरवण्यात आली. व 44,11,677 पात्र कुटुंबाची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी आवाज सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आली. असून त्यापैकी अनुसूचित जाती 4,89,562 अनुसूचित जमाती 8,19,959 अल्पसंख्याक 2,17,024, इतर 28,85,132 इतके लाभार्थी आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
तसेच काही तांत्रिक किंवा अन्य कारणामुळे आवाज प्लस सर्वेक्षण झाली नाही. अशा कुटुंबाची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्राधान्य क्रमांक यादीमध्ये नाव नसलेली परंतु पात्र असलेली. कुटुंबांना राज्य पुरस्कृत विविध योजना द्वारे लाभ देण्यात येतो. परंतु इतर संवर्गातील कुटुंबासाठी राज्य शासनामार्फत कुठली योजना राबवण्यात येत नाही. या वर्गासाठी नवीन योजना राबविण्याचे राज्य शासन विचारधारीन आहे. यास्तव आपले जिल्ह्यातील इतर संवर्गातील कुटुंबाची माहिती सोबत. दिलेल्या विहित नमुन्यात तत्काळ सादर करणे द्यावी. ही विनंती माननीय उपसंचालक मंजिरे टकले उपसंचालक आहेत. यांनी ही माहिती दिलेली आहे हे परिपत्रक आहेत.
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 नवीन शेळी पालन व कुकुट पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर :– येथे क्लिक करा व माहिती