Maha Dbt Farmer Scheme | कृषि यंत्र/अवजारे अनुदान योजना सुरु असा करा अर्ज

Maha Dbt Farmer Scheme | कृषि यंत्र/अवजारे अनुदान योजना सुरु असा करा अर्ज

कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे.  जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कृषि यंत्र/अवजारे अनुदान योजना 

  • १) ट्रॅक्टर
  • २) पॉवर टिलर
  • ३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
  • ४) बैल चलित यंत्र/अवजारे
  • ५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
  • ६) प्रक्रिया संच
  • ७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
  • ८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
  • ९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
  • १०) स्वयं चलित यंत्रे

अनुदान कोणाला किती मिळणार 

https://mahadbtmahait.gov.in/Farmer/PDF/Benefit_SubmissionOnFarmMechanization.pdfTractor Anudan

कृषी यांत्रिकीकरण योजना पात्रता 

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
  •  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
  •  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  •  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
  •  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
  •  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल

उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० (Maha Dbt Farmer Scheme) मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील.

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी  अर्ज 

कृषि यांत्रिकीकरण योजनांचा लाभ व संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व online पद्धतीने अर्ज कसा करावा, कागदपत्रे कोणकोणती लागणार असा करा अर्ज (Video) येथे पहा 

Tractor Anudan Yojana Dacuments

  •  आधार कार्ड
  •  ७/१२ उतारा
  •  ८ अ दाखला
  •  खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  •  जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
  •  स्वयं घोषणापत्र
  •  पूर्वसंमती पत्र


📢 pm किसान ट्रक्टर योजना सुरु:- येथे पहा 

Leave a Comment