Maharain Maharashtra Website :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखांमध्ये महत्त्वाची अपडेट आहे. प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी अपडेट गरजेचे आहे, आणि महत्त्वाची आहे. त्यामुळे हा लेख संपूर्ण आपल्याला वाचायचा आहे, तर पावसाची दैनंदिन आकडेवारी म्हणजेच आपल्या गावात किंवा आपल्या महसूल मंडळात किती पाऊस झाला आहे ?, किती मिली पाऊस झाला आहे. याची नोंद असणं शेतकऱ्यांना गरजेचे आहे.
Maharain Maharashtra Website
यावरूनच नुकसान भरपाई आणि पिक विमा साठी दावे आणि किती नुकसान झाले. त्यानुसार पिक विमा किंवा नुकसान भरपाई मिळत असते. त्यामुळे आपल्याला जाणून घेणं आहे की आपल्या महसूल मंडळात किती पाऊस झालेला आहे. हे या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने शासनाच्या वेबसाईट वरती पाहू शकता. तर या संदर्भातील संपूर्ण अपडेट हे लेखात देण्यात आलेला आहे. त्याकरिता हा लेख संपूर्ण आपल्याला वाचायचा आहे.
हवामान आकडेवारी कशी पहावी अपडेट
महावेध ही प्रणाली मे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि यांनी विकसित केलेली असून त्यामधील एक वर्षापूर्वीची हवामानविषयक आकडेवारी सर्वांसाठी उपलब्ध आहे. तर महारेन ही प्रणाली सार्वजनिक संकेतस्थळावर maharain.maharashtra.gov.in असून त्यावर दैनंदिन व प्रागतिक पर्जन्यमानाची आकडेवारी सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येते.
महारेन पावसाची आकडेवारी कशी पहावी
महारेन प्रणालीच्या अत्यावश्यक तांत्रिक देखभालीसाठी ०६ जुलै २०२२ पासून सदरचे संकेत स्थळ देखभाल दुरुस्तीमध्ये ठेवण्यात आलेले होते. परंतु असे असतानादेखील शेतकऱ्यांना दैंनदिन पर्जन्यमान पाहण्याकरीता थेट महावेध संकेतस्थळाच्या लिंकद्वारे महारेन संकेत स्थळावर दैनंदिन व प्रागतिक पर्जन्यमानाची आकडेवारी प्रकाशित करून सर्वांना उपलब्ध करून देण्यात येत होती. त्यामुळे संकेत स्थळ देखभाल दुरुस्तीखाली असतानाही दैनंदिन पर्जन्यमानाची आकडेवारी उपलब्ध करून देण्यामध्ये शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होवू दिलेली नाही.
हेही वाचा; 500 शेळ्या करिता योजना सुरु भरा ऑनलाईन फॉर्म व पहा जीआर
पावसाची आकडेवारी ऑनलाईन येथे पहा
सद्यस्थितीत महारेन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा पूर्ण करण्यात येवून पर्जन्यमानाचे महसूल मंडळ निहाय दैनंदिन व प्रागतिक अद्यावत अहवाल २२ ऑगस्ट २०२२ पासून प्रकाशित करण्यात येत आहेत. त्यामुळे महसूल मंडळ निहाय दैनंदिन व प्रागतिक पर्जन्यमानाच्या आकडेवारीसाठी maharain.maharashtra.gov.in या संकेत स्थळाचे अवलोकन करावे असे सर्वांना कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा