mukhyamantri krishi sinchan yojana | 80% अनुदान ठिबक, तुषार ऑनलाईन अर्ज

mukhyamantri krishi sinchan yojana | 80% अनुदान ठिबक तुषार ऑनलाईन अर्ज

मागेल त्याला ठिबक योजना 

नमस्कार सर्वांना, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना ही राज्य सरकारने राबविण्यास मंजुरी दिली आहे राज्यातील जे

शेतकरी आहे या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना अर्थातच ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजना सदर योजने

अंतर्गत राज्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत आतापर्यंत जे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी त्यांना 55% टक्के

अनुदान दिले जात होते आणि जे इतर शेतकरी आहेत

अर्थातच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांच्या व्यतिरिक्त जे शेतकरी यांना 45% टक्के असा अनुदान दिलं जात होतं, राज्य

सरकारने या मध्ये नवीन योजनेला मंजुरी देऊन राज्यातील शेतकरी यांना जे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी त्यांना खर्चाच्या

माफ दंडाच्या 80% टक्के व इतर शेतकऱ्यांना 75% टक्के अनुदान देय असणार आहे.

Mukhyamantri Shashwat Krishi Sinchan Yojana

याची मर्यादा 5 हेक्‍टरपर्यंत असणार आहे, या शेतकऱ्यांची जमीन हि 5 हेक्‍टरपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार

नाही आणि ज्या शेतकऱ्यांची पाच हेक्‍टरपेक्षा कमी जमीन आहे त्यांना या योजनेस 75% टक्के अनुदान दिले जाणार आहे, अल्प

व अत्यल्प भूधारक आपण अडीच आपल्याला एकर जमीन आहे तर आपल्याला 80 टक्के अनुदान या योजने मधून आपल्याला

मिळणार आहे तर ही योजना नेमकी कशा प्रकारे राज्यात राबवली जाणार आहे

हे देखील जाणून घेणे अतिशय गरजेचे आहे तर सदर योजना ही केंद्राची प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या योजनेअंतर्गत अल्प

व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान लागू आहे आणि त्याच बरोबर राज्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या

योजनेअंतर्गत अतिरिक्त पूरक अनुदान असे एकूण 80 टक्के अनुदान आणि त्याचबरोबर 75 टक्के अनुदान असे या दोन्ही

योजने मिळून लाभार्थ्यांना अनुदान यादी दिला जाणार आहे.

Thibak Sinchan Anudan Maharashtra

यामध्ये आता शेतकऱ्यांना शेत पिकाचे कमी प्रमाणात आणि कमी खर्चात चांगल्या प्रकारे उत्पादन आणि कमी महेनत घेता

शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या अंतर्गत लाभ मिळणार

आहे. राज्यात शेतकऱ्यांसाठी पुरेसे पाणी किंवा वीज उपलब्ध नसल्याकारणाने राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट

होत आहे यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचं पाऊल शेतकऱ्यांसाठी उचललेल आहे नवीन योजनेस मंजुरी दिलेली आहे. या

योजनेअंतर्गत आता कमी पाण्यामध्ये शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो

आणि त्याच बरोबर या योजनेचा लाभ आपल्याला 80 टक्के अनुदान वरती उपलब्ध करून दिले जाणार आहे यासाठी

ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहे तर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन साठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत

यासाठीची पात्रता काय आहेत कोणत्या शेतकऱ्यांना या मध्ये 80 टक्के अनुदान मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना 75

टक्के हे अनुदान त्याचबरोबर योजनेसाठी पात्रता काय आहे

80% अनुदान ठिबक,तुषार पात्रता काय 

कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट कोणती आहे ही संपूर्ण माहिती आपण

आजच्या लेखामध्ये जाणून घेणारा हा लेख संपूर्ण वाचा या लेखांमध्ये संपूर्ण माहिती आपल्याला सविस्तर मध्ये दिलेले आहे.

शेतकऱ्यांना आता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील

शेतकऱ्यांना अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहे त्यांना 80 टक्के अनुदान आणि इतर जे शेतकरी आहेत त्यांना 75 टक्के

अनुदान असे या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे

सदर योजनेचा अर्ज महाडीबीटी पोर्टलवर अर्थातच एक शेतकरी अनेक योजना या पोर्टल वर राबवण्यात येत आहे या विषय जो

शासन निर्णय आहे हा निर्गमित करण्यात आलेला आहे या योजनेसंदर्भातील ची संपूर्ण शासन निर्णय आहे त्यांची लिंक आपण

खाली दिलेली आहे तिथून आपण ते डाऊनलोड करू शकता.

80% ठिबक योजना कागदपत्रे
  • ७/१२ प्रमाणपत्र
  •  ८-ए प्रमाणपत्र
  •  वीज बिल
  •  खरेदी केलेल्या संचाचे बिल
  •  पूर्वसंमती पत्र
लाभ घेण्यासाठी पात्रता
  •  शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
  •  शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  •  शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  •  जर लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला     पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत     कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील ७ वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
  •  शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.
  •  सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
  •  शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.
  •  शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म-सिंचन संच विकत घ्यावे, ते   शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड     कराव्यात.
सादर योजनेचे संपूर्ण GR डाऊनलोड लिंक:-
  1. मुख्य मंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना :- पहिला GR
  2. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना :- दुसरा GR 
  3. मुख्यमं त्री शाश्वत कृषि सिंचन योजना :- तिसरा GR
  4. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना : चौथा GR
ठिबक सिंचन योजना ऑनलाईन अर्ज

80% अनुदान ठिबक योजना ऑनलाईन कसा करावा ? :-  80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा त्यासाठी वेबसाईट कोणती आहे,व त्यावर online अर्ज कसे करायची, त्यासंदर्भात कागदपत्रे,पात्रता,अनुदान संपूर्ण माहिती जाणून घेण्यसाठी online अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी अर्ज करावा त्यासाठी अआप्न व्हिडिओ बनवला आहे तो आपण पाहून online अर्ज करू शकता व 80% अनुदान व 75% अनुदानचा लाभ घेऊ शकता व्हिडीओ लिंक :- येथे पहा   


📢 90% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार:- येथे पहा 

Leave a Comment