Pm Ujjwala Yojana Free Gas :- जनसामान्य नागरिकांसाठी त्याचप्रमाणे खेड्यापाड्यातील महिलांसाठी शासनामार्फत विविध अशा योजना राबविण्यात येतात. महिलांचा विचार करून नुकतीच केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना.
आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना काय आहे ? या योजनेसाठी अटी व पात्रता काय असेल ? योजनेअंतर्गत अर्जासाठी लागणारी कागदपत्रे व अर्ज कसा करावा ? इत्यादी संपूर्ण माहिती.
Pm Ujjwala Yojana Free Gas
आपल्या देशात मोठ्याप्रमाणावर खेडीपाडी आहेत. खेड्यातील बहुतांश महिला आज सुद्धा दररोजचा स्वयंपाक चुलीवर करतात. त्यासाठी लागणाऱ्या इंधनासाठी महिलांना सरपंच गोळा करत वन वन फिरावं लागतं.
चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे धुराचा परिणाम होऊन महिलांच्या डोळ्यावरती सुद्धा परिणाम होतो. वरील सर्व बाबींचा विचार करून महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याची योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत सुरू करण्यात आली.
बऱ्याच महिलांना या योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे या योजनेचा त्यांना फायदा घेता आला नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा आणि शासनामार्फत मोफत गॅस सिलेंडर मिळवा.
येथे पहा कागदपत्रे,पात्रता, अर्ज प्रोसेस व भरा ऑनलाईन फॉर्म
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना अर्ज कसा करावा ?
१) प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत तुम्हाला सहज व सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल. यासाठी सर्वप्रथम केंद्र शासनामार्फत देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट pmuy.gov.in ला भेट द्या.
२) वेबसाईट उघडल्यानंतर तुमच्यासमोर एक पर्याय दिसेल apply for new ujjwal 2.0 connection या पर्यायावर ती क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठीची पात्रता व आवश्यक कागदपत्रांची यादी दाखवली जाईल ती काळजीपूर्वक वाचून घ्या.
३) जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर वरील कागदपत्र व पात्रता सह तुम्ही तुमच्या जवळील गॅस डिस्ट्रीब्यूटर यांना संपर्क करून या मोफत गॅस योजनेचा लाभ मिळू शकता.
Pm Ujjwala Yojana Online Apply
४) पात्रता व कागदपत्राच्या खाली तुम्हाला Online Portal असा एक पर्याय दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन टॅब ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला Indane, Bharatgas, HP अशा प्रकारचे तीन पर्याय दाखवले जातील.
तुम्हाला कंपनीचा मोफत गॅस कनेक्शन हवा असेल, त्या कंपनीच्या चिन्हा पुढील Click here to apply या पर्यायावर क्लिक करा. ५) आता तुमच्यासमोर एक नवीन New Consumer Registration फॉर्म उघडेल.
येथे टच करून ऑनलाईन फॉर्म व अधिक सविस्तर माहिती वाचा
Pm Ujjwala New Consumer Registration
तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरून सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या जवळील गॅस वितरकामार्फत तुम्हाला कागदपत्रसाठी संपर्क केला जाईल व पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
निष्कर्ष : महिलांसाठीच्या या महत्त्वकांक्षी योजनेचा तुम्ही नक्की फायदा घ्या. कारण यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची रक्कम किंवा शुल्क आकारले जाणार नाही विशेष खेड्यापाड्यातील महिलांसाठी ही योजना महत्त्वकांक्षी ठरत आहे.
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा