Shetkari Karj Mafi Yojana : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र अर्थसंकल्पात राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजनाला मंजुरी दिली आहे. तसेच कर्जमाफी संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय देखील राज्य सरकारने घेतला आहे. नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहे त्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. तरी याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2022
कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून. महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करणारा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या पाच क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. विकासाची पंचसूत्री, सामाजिक उत्तरदायित्व. पर्यटन विकासाच्या नव्या क्षेत्रांना बळ, संस्कृती जतन आणि वारसा स्थळांचा विकास करण्यासाठी योजना ही या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
केंद्र सरकारची शेळी पालन 50 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु
नियमित कर्जफेड योजना 2022
नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणारा. सर्व समावेशक अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सादर केला.
40 शेळ्या 2 बोकड योजना 2022 केंद्राची योजना सुरु
शेतकरी अनुदान योजना 2022
सन 2022-23 साठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी 13,340 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. वार्षिक योजनेसाठी 1,50,000 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 12,230 कोटी. अनुसूचित जमाती उपयोजनेसाठी 11,199 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. महसूली जमा 4,03,427 कोटी प्रस्तावित असून महसुली खर्च 4,27,780 कोटी रूपये आहे. महसुली तूट 24,353 कोटी रूपये अपेक्षित आहे, असे (Shetkari Karj Mafi Yojana) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
भूविकास बँक कर्ज योजना 2022
कोवीड-19 च्या कालावधीत कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. या क्षेत्राला आणखी बळकट करण्यासाठी 23 हजार 888 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत, भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी. आधारभूत किंमतीनुसार शेतमाल खरेदीकरीता 6,952 कोटी रूपयांची तरतूद. आणि येत्या दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्यांचा समावेश करून अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करून ती 75 हजार करण्यात आली आहे.
कुकुट पालन एकूण प्रकल्प 25 लाख रु. अनुदान केंद्राची योजना सुरु 2022
कृषी सोलर पंप योजना 2022
कृषी संलग्न क्षेत्राला बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या संगणकीकरणासाठी 950 कोटी, मृद. आणि जलसंधारणासाठी 4,774 कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. वर्षभरात 60,000 वीज पंपांना जोडणी देण्याचे उद्दीष्ट आहे.
80% अनुदानावर ठिबक सिंचन योजना 2022 करिता सुरु येथे पहा संपूर्ण माहिती
रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड योजनेत केळी, ड्रॅगन फ्रुट, अॅव्हॅकॅडो, द्राक्षे फळांचा तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा समावेश करून फळशेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. पशुधन विकासासाठी देशी गायी आणि म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी राज्यात तीन मोबाईल प्रयोगशाळा विकसित केल्या जाणार आहेत, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
📢 कुकुट पालन 25 लाख रु. योजना 2022 करिता सुरु :- येथे पहा
📢कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म 2022 :- येथे पहा