Sheli Palan Scheme Maharashtra : नमस्कार सर्वांना या लेखामध्ये केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियान योजना. अंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध योजनेचा लाभ आपल्याला कसा घ्यायचा आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, त्याचबरोबर आपला जो प्रकल्प आराखडा आहे, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा कसा तयार करायचा आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. या राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) योजनेंतर्गत 50% टक्के अनुदान दिलं जातं तर या योजना अंतर्गत कोणकोणत्या बाबींसाठी अनुदान दिलं जातं. त्याची प्रोसेस नेमकी काय आहे, संपूर्ण माहिती लेखांमध्ये जाणून घेणार आहोत, हा लेख संपूर्ण वाचा.
Natinoal Livestock Mission Scheme
राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेला राज्यमध्ये 27 डिसेंबर 2021 रोजी शासनाने मंजुरी दिली होती. आणि या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना विविध 4 बाबी करिता हे अनुदान दिलं जातं. सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 50% टक्के अनुदान दिलं जातं. त्यामध्ये सर्वप्रथम शेळीपालन, कुक्कुटपालन, वराह पालन म्हणजेच डुक्कर पालन, व पशुखाद्य वैरण याकरिता अनुदान ही दिले जाते. आणि अनुदानाची टक्केवारी 50% टक्के आहे. यामध्ये 50 टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिले जाणार आहे, या योजनेमध्ये लाभार्थी कोण असणार आहेत. त्यासाठीची पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्की पहा.
↪ शासन निर्णय GR संपूर्ण माहिती येथे पहा ↩
कुकुट पालन अनुदान योजना 2022
ग्रामीण कुक्कुट पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास या योजनेअंतर्गत केंद्र हिस्सा 50% टक्के असणार आहे. आणि 50% हे स्वःता किंवा यामध्ये आपण बँक लोन कर्ज हे घेऊ शकता. आणि बँक लोन पास करण्याची जबाबदारी आहे ही स्वतःची असणार आहे. कमीत कमी 1000 अंड्यावरील लो इनपुट तंत्रज्ञान कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन व अंडी उबवणी केंद्र ची स्थापना. यासाठी उर्वरित 50% टक्के बँकेचे कर्ज किंवा लाभार्थी स्वहिस्सा असणार आहे. यासाठीचे 50% टक्के अनुदान आहे. म्हणजेच 25 लाख रुपय हे आपल्याला दोन हप्त्यांमध्ये (Sheli Palan Scheme Maharashtra) आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर दिले जाणार आहे. तसेच या योजनेची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती पाहू शकता.
कुकुट पालन अनुदान योजना यासाठी चा प्रकल्प आराखडा अर्थातच Details Project Report हा कसा करावा केंद्र सरकारच्या माहितीनुसार त्याचे स्ट्रक्चर हे पाहण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ फाईल ओपन करून पाहू शकता.
↪येथे योजनेची संपूर्ण माहिती पहा↩
शेळीपालन अनुदान योजना 2022
ग्रामीण शेळी मेंढी पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास यासाठी केंद्र सरकार 50 टक्के अनुदान. आणि स्वता किंवा बँकेचे कर्ज हे 50 टक्के असणार आहे 50 टक्के अनुदान हे भांडवली अनुदान. म्हणून दोन समान हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. यामध्ये 500 शेळ्या किंवा मेंढ्या त्यात 25 बोकड किंवा 25 नर मेंढा गटाची स्थापना यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या विषयी संपूर्ण सविस्तर आणखी माहिती तसेच शासनाचा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.
↪ शासन निर्णय GR संपूर्ण माहिती येथे पहा ↩
शेळी पालन अनुदान योजना यासाठी चा प्रकल्प आराखडा अर्थातच Details Project Report हा कसा करावा केंद्र सरकारच्या माहितीनुसार त्याचे स्ट्रक्चर हे पाहण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ फाईल ओपन करून पाहू शकता.
वराह, डुक्कर पालन योजना 2022
वराहपालन द्वारे उद्योजक्ता विकास याकरिता लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान यामध्ये दिला जाणार आहे. यामध्ये 100 मादी आणि 25 नर यावर हा गटाची स्थापना करणे याकरिता 50 टक्के अनुदान आहे. त्यासाठी 30 लाख रुपये पर्यंत जास्तीत जास्त अनुदान आपल्याला या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. आणि उर्वरित 50 टक्के आहे ते बँकेचे कर्ज किंवा पण लाभार्थी स्वता आपल्याला उभा करायचा आहे.
डुक्कर पालन अनुदान योजना यासाठी चा प्रकल्प आराखडा अर्थातच Details Project Report हा कसा करावा केंद्र सरकारच्या माहितीनुसार त्याचे स्ट्रक्चर हे पाहण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ फाईल ओपन करून पाहू शकता.
📢 शेतकऱ्यांना 50% पेक्षा जास्त योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 :- येथे पहा