Mahadbt Krushi Yantrikikaran Yojana | ट्रॅक्टर,पॉवर टिलर सर्व अवजारे,यंत्र योजना 2022 करिता ऑनलाईन फॉर्म लगेच भरा

Mahadbt Krushi Yantrikikaran Yojana : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी शेती करत असताना लागणारे विविध अवजारे यंत्र व ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर. यासाठी सरकारने कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू केली आहे. सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अर्थसाह्य म्हणजेच अनुदान दिले जाते. तर यामध्ये कोणत्या अवजारांसाठी किंवा कोणत्या यंत्रसाठी किती अनुदान दिले जाणार आहे. हे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत या साठी हा लेख संपूर्ण वाचा.

Mahadbt Krushi Yantrikikaran Yojana

कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 

राज्यामध्ये कृषी उन्नती योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपभियाण ही योजना राबवली जाते. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित अवजारे, ट्रॅक्‍टर, पॉवर टिलर चलित अवजारे., काढणीपश्‍चात तंत्रज्ञान अवजारे, अशा प्रकारचे मनुष्य चलित अवजारे, बैलचलित अवजारे, इ. बाबींसाठी अनुदान दिले जातं.

कुकुट पालन योजनेसाठी 25 लाख रु. अनुदान योजना 2022 करिता सुरु 

कृषी यांत्रिकीकरण योजना अनुदान किती व कसे  

सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान कसे दिले जाते. तर यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक तसेच अनुसूचित जाती व जमातीतील आणि महिला शेतकऱ्यांना 50% टक्के अनुदान मिळते. इतर शेतकरी यांना 40% टक्के अनुदान दिले जाते. मात्र यामध्ये राईस मिल, दालमिल, पॅकिंग मशीन, ग्राइंडर पोलिशरच्या बाबतीत अल्प व अत्यल्प महिला अनुसूचित जाती जमाती. या लाभार्थ्यांना 60% टक्के तर इतर लाभार्थ्यांना 50% टक्के अनुदान.

ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 करिता सुरु 

कृषी यांत्रिकीकरण योजना कागदपत्रे

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कागदपत्रे सातबारा, 8 अ उतारा, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, यंत्राची कोटिशन, परीक्षण अहवाल, जातीचा दाखला, इत्यादी माहिती आपल्याला लागणार आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवड झाल्यानंतर किंवा पूर्व संमती मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी अवजारे किंवा ट्रॅक्टर पावर (Mahadbt Krushi Yantrikikaran Yojana) टिलर खरेदी ही कुठून करायचे आहे ते पहा खाली.

परीक्षण अहवाल व कोटेशन कुठून घ्यावे 

पुर्वसंमती मिळाली अवजारे कुठून खरेदी करावे 

पुर्वसंमती मिळाल्या नंतर लाभार्थी यांनी खुल्या बाजारतील आपल्या पसंतीच्या अधिकृत विक्रेते यांचे कडून यंत्र/औजारे विहित मुदतीत खरेदी करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत खरेदी केले नाही तर पुर्वसंमती रद्द होवू शकते. लाभार्थीं यांनी खरेदी करावयाची औजारे केंद्रीय तपासणी संस्था किंवा केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या संस्थांकडून तपासणी केलेली असणे बंधनकारक असुन त्यांनाच अनुदान देय आहे.

Mahadbt Krushi Yantrikikaran Yojana

नवीन सिंचन विहीर योजना 2022 करिता सुरु 

Tractor Anudan Yojana 2022

लाभार्थी यांनी विक्रेते यांचेकडून सदर यंत्र/औजाराबाबत सक्षम संस्थेने दिलेल्या परिक्षण प्रमाणपत्राचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. औजारे खरेदी करताना त्यावर परिक्षण अहवाल व मॉडेल क्रमांक एम्बॉस केलेला आहे का याची खात्री करुन यंत्र/औजार खरेदी करावे. ट्रॅक्टर , पॉवर टीलर, रिपर, रिपर कम बाइन्डर, पैडि ट्रान्सप्लांटर, थ्रेशर, पॉवर वीडर या औजारांचे बाबतीत ही औजारे खरेदी करताना काळजी घेणे महत्वाचे आहे. ही औजारे केंद्र शासनाच्या यादीतील नमुद मॉडेल/मेकचीच असली पाहिजेत. 

महाडीबीटी पोर्टल वरती विविध कृषी यंत्रे अवजारे ट्रॅक्टर पावर टिलर या बाबींसाठी ऑनलाईन अर्ज करण्या साठी  त्याची लिंक खाली दिली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये कोणकोणत्या बाबींसाठी हे अनुदान दिलं जातं. त्या विषयीची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे ते व्हिडिओ पण नक्की पहा.

येथे पहा हा व्हिडीओ 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment