Gai Palan Shed Yojana : नमस्कार सर्वांना राज्यातील पशुपालक तसेच शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. गाई/ म्हैस गोठा अनुदान योजना आणि शेळी पालन शेड अनुदान योजना व कुकुट पालन शेड योजना. यासाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू करण्यात आलेले आहे. यामध्ये 100 टक्के अनुदान आपल्याला दिलं जात याच योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. या योजनेचा शासन निर्णय व शासन निर्णयात मध्ये दिलेली संपूर्ण माहिती आणि या योजनेचा लाभ आपल्याला कसा घ्यायचा आहे. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना
राज्यात शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राज्य योजना म्हणून राबवण्याबाबत. दिनांक 3 फेब्रुवारी 2021 रोजी शासन निर्णय नियोजन विभाग यांच्याकडून निर्गमित करण्यात आला होता. योजनेबद्दल आज या लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील कामांची मागणी करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत. खालील नमूद केलेल्या 4 वैयक्तिक कामांना सर्वोत्तम प्राधान्याने सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात राबवण्यात यावी. याबाबत दिनांक 9 ऑक्टोंबर 2012 शासन निर्णय मधील एका गावात जास्तीत जास्त 5 कोठा याची मर्यादा या शासन निर्णयान्वये वगळण्यात आले आहे. तर आता यामध्ये मनरेगा योजनेअंतर्गत काम मागणारे व्यक्ती आहेत. त्या पात्र शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या अंतर्गत वैयक्तिक कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
गाय म्हैस गोठा अनुदान योजना 2022
नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक दि. 09 ऑक्टोबर 2012 या अंतर्गत. तसेच नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 1 ऑक्टोंबर 2016 मधील. परिच्छेद 3.5.7 तरतुदीनुसार 6 गुरांकरिता 26.95 चौ. मी जमीन पुरेशी आहे. त्याची लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असावी गवान 7.7 मीटरस 0.2×0.65 मी. आणि 250 लिटर मूत्रसंस्था टाकी बांधण्यात यावी. जनावरांना पिण्याचे पाण्याची दोनशे लिटर क्षमतेची टाकी सुद्धा यामध्ये बांधण्यात यावी. तर सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे. लाभार्थी सदर योजनेस पात्र असतील तर गोट्यांच्या प्रस्तावासोबत जनावराची टॅगिंग आवश्यक राहणार आहे. जर आपल्याला योजनेचा लाभ घ्यायचा असेल या कामाला नियोजन रोहयो विभाग दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजीच्या. शासन परिपत्रकातील परिशिष्ट 9 मधील अनुक्रमांक 75000 नरेगांतर्गत 77 हजार 188 इतका अंदाजित खर्च येईल.
👉👉गाय म्हैस गोठा 100% अनुदान,कागदपत्रे, अर्ज कसा करावा येथे पहा👈👈
शेळीपालन शेड अनुदान योजना 2022
शेळी पालन शेड योजना नियोजन विभाग शासन परिपत्रक दिनांक 9 ऑक्टोबर 2012. आणि तसेच नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 11 ऑक्टोबर 2016 मधील परिषद 3.5.9 तरतुदीनुसार. दहा शेळ्या करिता 7.50 चौ. मीटर आहे तसेच त्याची लांबी 3. 75 मीटर रुंदी 2 मीटर असावी. चारी ही भिंत सरासरी उंची 2.5 मीटर असावी भिंती 1:4 प्रमाण असलेल्या सिमेंटच्या व विटांच्या असाव्यात. छतास लोखंडी जाळ्याचा आधार देण्यात यावा. छतासाठी लोखंडी पत्रे सिमेंटचे पत्रे वापरावीत. तळासाठी मुरूम टाकावा शेळ्यांना पिण्याचे पाण्याचे टाकी देखील आपल्याला गरजेचा आहे. एका कुटुंबात जास्तीत जास्त 30 शाळेकरिता तीन पट अनुदान देय आहे.
👉👉शेळी पालन शेड 100% अनुदान,कागदपत्रे पात्रता अर्ज नमुना व अर्ज कसा करावा येथे पहा👈👈
कुकुटपालन शेड योजना 2022
कुकुट पालन शेड बांधणी सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या. निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेली लाभार्थी पात्र असतील. तसेच भूमिहीन शेती नसलेल्या कुटुंबांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तर या कामाला नियोजन रोह्या विभाग दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट 9 मधील अनु क्रमांक 77 नुसार नरेगा. अंतर्गत एकूण 50 हजार 760 रुपये इतका अंदाजित खर्च येईल. आणि त्याचा तपशील आपण खालील प्रमाणे अकुशल आणि कुशल यामध्ये अकुशल खर्च 4760 रुपये. प्रमाण 10 टक्के कुशल खर्चामध्ये 45000 प्रमाण 90 टक्के एकूण 49 हजार 760 प्रमाण 100 टक्के अशाप्रकारे अनुदान आहे. तर आपण या लेखांमध्ये जाणून घेतले आहे. की शेळी पालन शेड आणि कुकुट पालन शेड, गाय म्हैस गोठा (Gai Palan Shed Yojana) योजना याबद्दलची संपूर्ण माहिती. अनुदान कसे असेल याबाबत माहिती पाहिली.
👉👉या योजनेचा शासन निर्णय डाऊनलोड येथे करा👈👈
📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना सुरु 2022 :- येथे पहा
📢 नुकसान भरपाई 2 टप्पा मदत GR आला :- येथे पहा