Well Subsidy Maharashtra :- शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन लाख रुपयांचे अनुदान मिळत होते. मात्र आता त्यामध्ये रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी वाढ केली आहे.
या योजनेअंतर्गत प्रति विहीर एक लाख रुपयांची अनुदानात वाढ करण्यात आली असून, आता चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी सध्याच्या महागाईमध्ये दिलासा मिळाला आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Well Subsidy Maharashtra
त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मागील त्याला विहीर या योजनेअंतर्गत विहिरीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नव्या विहिरींसाठी १ लाख अनुदान अधिकचे मिळणार आहे.
काय आहे मागेल त्याला विहीर योजना ?, रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी. मागेल त्याला विहीर योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत पंचायत समिती प्रशासनाला प्रस्ताव सादर करावा लागतो.
सिंचन विहीर अनुदान योजना
त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी मिळते. मंजुरी मिळाल्यानंतर दोन ते चार टप्प्यात संबंधित शेतकऱ्यांना विहिरीच्या कामानुसार चार लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
तीन ऐवजी आता चार लाख अनुदान मिळणार शेतकऱ्यांसाठीच्या मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात आता एक लाख रुपयांची वाढ केली आहे.
विहीर योजना कागदपत्रे, पात्रता टच करून पहा
विहीर अनुदान योजना
हे अनुदान आता चार लाख रुपयांपर्यंत पोहोचले. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळत असलेल्या तीन लाख रुपयांच्या अनुदानात एक लाख रुपयांची वाढ झाल्याने ते चार लाख रुपयांवर पोहोचले आहे.
अर्ज कसा कराल ?, मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत सर्वप्रथम लाभार्थी शेतकऱ्याला ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा लागतो. ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन. पंचायत समिती प्रशासनाला सादर करण्यात येतो.
आता या शेतकऱ्यांना 100% अनुदान मिळणार 5hp सोलर पंप पहा जीआर व करा ऑनलाईन अर्ज
विहीर योजना अर्ज कसा करावा ?
त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाकडून जिल्हा परिषद प्रशासनाकडे मंजुरीसाठी अर्ज सादर केला जातो. जिल्हा परिषद प्रशासनाची मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांला त्या विहिरींचा लाभ दिला जातो.
येथे टच करून पहा शासन निर्णय व अर्ज,कागदपत्रे पात्रता संपूर्ण माहिती
📢 100% अनुदानावर फळबाग,फुलझाडे लागवड योजना सुरु :- येथे पहा
📢 ट्रक्टर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा